रस्त्याच्या कामात पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा सगळ्यात मागे, आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट 

By भीमगोंड देसाई | Updated: March 11, 2026 19:29 IST2026-03-11T19:29:32+5:302026-03-11T19:29:58+5:30

नागपूर-रत्नागिरी, संकेश्वर-बांधा रस्त्यांची भर

Kolhapur district is lagging behind in Pune division in road works, clear from the economic survey report | रस्त्याच्या कामात पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा सगळ्यात मागे, आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट 

संग्रहित छाया

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांच्या नियंत्रणाखालील रस्ते कामात कोल्हापूर जिल्हा पुणे विभागात सर्वात शेवटी राहिला आहे. सन २०२५-२६ च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात ९ हजार ५१९ किलोमीटरचे रस्त्याचे रुंदी, लांबीकरण झाले आहे.

सर्वांत अधिक म्हणजे पुणे जिल्ह्यात २० हजार २१२ किलोमीटरची रस्ते झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात डोंगर, नद्या, ओढे, नाले, पिकाऊ जमीन असल्याने रस्ते रुंदीकरण करण्यात अडचणी येत आहेत. दरडोई जमिनीचे क्षेत्र कमी झाल्याने नवीन रस्ते करण्यावरही मर्यादा येत आहेत, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

रस्ते चांगले असतील तर दळणवळण वाढते. विकास दर वाढतो. पर्यटनवाढीला चालना मिळते. चकाचक रस्त्यामुळे इंधन, वेळ, पैशांची बचत होते. यामुळे सरकार असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण करणे, नव्याने रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देत आहे. राज्य सरकार नव्याने शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सातारा-कागल राष्ट्रीय महामार्गच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

मात्र, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत गेल्या वर्षात सर्वांत कमी रस्ता रुंदी, लांबीचे काम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचे पुढे आले आहे. गेल्या वर्षभरात संकेश्वर-बांधा रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जिल्ह्यातील काम रखडले आहे.

वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात ३.७५ मीटर, साडेपाच मीटर, सात मीटर रस्त्यांचे जिल्हानिहाय किलोमीटरमध्ये काम असे :
पुणे - २०२१२, सोलापूर - १७०१४, सातारा - १३०१५, सांगली - १२६०३, कोल्हापूर - ९५१९.

राज्यात पुणे विभाग आघाडीवर

राज्यात पुणे विभागात वर्षभरात ७२ हजार ३६२ किलोमीटरच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि लांबीकरण झाले आहे. राज्यात पुणे विभाग आघाडीवर आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ७० हजार ३३५ कि.मी., नाशिक विभाग ७० हजार ३२९ कि.मी., तर नागपूर विभागात ५२ हजार ६०३ कि.मी. अमरावती विभागात ४२ हजार ७०५ कि.मी., कोकण विभागात ३७ हजार ४८९ किमीचे रस्ते काम झाले आहेत.

Web Title : पुणे विभाग में सड़क कार्यों में कोल्हापुर पिछड़ा: रिपोर्ट

Web Summary : भूभाग और भूमि की कमी से बाधित, कोल्हापुर जिला सड़क विकास में पुणे विभाग से पीछे है। पुणे सड़क विस्तार में राज्य का नेतृत्व करता है।

Web Title : Kolhapur lags in road work in Pune division: Report

Web Summary : Kolhapur district trails Pune division in road development, hindered by terrain and land constraints. Pune leads the state in road expansion.