शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रातील नोकर भरतीत आर्थिक व्यवहाराच्या तक्रारी

By भीमगोंड देसाई | Updated: April 29, 2026 13:17 IST

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी, भरती प्रक्रिया बेकायदेशीर, गुपचूप झाल्याचा आरोप

कोल्हापूर : दीड वर्षापूर्वी सुरु झालेल्या जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रात खासगी कंपनीतर्फे झालेल्या नोकरभरती प्रक्रियेत उमेदवारांकडून आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. कंपनीसंबंधी जिल्हा परिषद सदस्यांकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही सदस्यांनी त्या कंपनीच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना विश्वासात घेतल्याशिवाय भरती प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायोटे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे  यांच्याकडे लेखी केली आहे. कंपनीने उमेदवारांची निवड करताना निकष पाळलेले नाहीत, अशी लेखी तक्रार जि.प. सदस्य सागर धुंदरे यांनी केली आहे.

जिल्ह्यात दीड वर्षापूर्वी दहा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाली आहेत. मात्र, येथे कायमस्वरूपी आरोग्य कर्मचारी नियुक्त नसल्याने अतिरिक्त कार्यभारावर कामकाज केले जात होते. दरम्यान येथील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने कंपनीतर्फे कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांच्या मुदतीत आरोग्य कर्मचारी भरतीचा निर्णय घेतला. पुण्यातील कंपनीने कर्मचारी भरतीची प्रक्रिया राबवली.

पदनिहाय पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया सुरु आहे. याच टप्यात भरतीची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झालेली आहे, पारदर्शकपणे प्रक्रिया राबवली नसल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या आहेत. त्याला आरोग्य अधिकाऱ्यांनीही अधिकृत दुजोरा दिला आहे. परिणामी भरती प्रक्रिया वादात सापडली आहे.

जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी नव्हते, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. त्यामुळे शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीतर्फे कंत्राटी तत्त्वावर नोकरभरती केली आहे. यासंबंधी काही सदस्यांच्या तक्रारी आहेत. - अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर

कंपनीने नोकरभरती बेकायदेशीर, गुपचूपपणे केली आहे. ज्या कंपनीने भरतीची प्रक्रिया राबविली आहे, त्या कंपनीचे कोणतेही रेकॉर्ड गुगलवर सापडत नाही. लेटर हेडवर कंपनीचा रजिस्ट्रेशन आणि जीएसटी नंबर नाही. - सागर धुंदरे, सदस्य, कोल्हापूर

या आरोग्य केंद्रात भरती होणार

राधानगरी : ओलवण, म्हासुर्ले, तुरंबे , बिद्री

शिरोळ : कवठेगुलंद

पन्हाळा : पोर्ले 

करवीर : आरळे 

भुदरगड: मडूर

चंदगड : राजगोळी

हातकणंगले : कुंभोज

कोणत्या पदावर किती जणांची भरती

आरोग्य सहाय्यक पुरुष १

प्रयोगशाला तंत्रज्ञ ५

औषध निर्माता ७

कनिष्ठ लिपिक ९                    

परिचर २२

English
हिंदी सारांश
Web Title : Complaints of Financial Dealings in Primary Health Center Recruitment

Web Summary : Kolhapur Zilla Parishad members allege financial irregularities in the recruitment process for primary health center staff. Concerns arise over transparency and adherence to selection criteria by the contracted company. An inquiry is demanded due to suspicious recruitment practices.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरjobनोकरी