शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

कोल्हापूर : शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सुटका, पोलिसांची परवानगी न घेतल्याने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 6:50 PM

उसाची एफ. आर. पी. अधिक २०० रुपये असे एकरकमी पैसे व्याजासह द्यावेत, या मागणीसाठी लक्ष्मीपुरीतील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर गुरुवारी आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या सहाहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सुटकापोलिसांची परवानगी न घेतल्याने कारवाई: साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलनाचा प्रयत्न

कोल्हापूर : उसाची एफ. आर. पी. अधिक २०० रुपये असे एकरकमी पैसे व्याजासह द्यावेत, या मागणीसाठी लक्ष्मीपुरीतील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर गुरुवारी आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या सहाहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले.

 कोल्हापुरातील साखर सहसंचालक यांच्या कार्यालयासमोर गुरुवारी आंदोलनासाठी आलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले.महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक होऊन त्यामध्ये ‘एफआरपी’ अधिक १०० व दोन महिन्यांनंतर १०० रुपये असा ऊसदराचा निर्णय झाला आहे. असा निर्णय झाला असताना कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफ. आर. पी.ची मोडतोड करून २५०० रुपये पहिली उचल देण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी संघटनेला मान्य नाही.

त्या विरोधात गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते लक्ष्मीपुरी येथील साखर सहसंचालक कार्यालयासमोर आले. या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना वाहनातून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांची परवानगी न घेता आंदोलनाचा प्रयत्न केल्याने माणिक शिंदे यांच्यासह अजित पाटील, गुणाजी शेलार, टी. आर. पाटील, बाळासाहेब मिरजे, संभाजी चौगुले, आदी कार्यकर्त्यांना मुंबई पोलीस कायदा कलम ६८ नुसार ताब्यात घेऊन व कलम ६९ नुसार ताकीद देऊन सोडून देण्यात आले.

 

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर