बूट पॉलिश व्यवसायात अडथळा आणतो म्हणून चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 04:21 PM2020-05-27T16:21:42+5:302020-05-27T16:24:49+5:30

बूट पॉलिशच्या व्यवसायात अडथळा आणतो म्हणून एकावर चाकूहल्ला करून त्याला जखमी करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा सुभाषनगरात घडला. या घटनेत शिवाजी साताप्पा पाटील (वय ३८, रा. सुभाषनगर झोपडपट्टी, कोल्हापूर) हे जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोघा भावांवर गुन्हा दाखल केला आहे.

Knife attack as shoe polish hinders business | बूट पॉलिश व्यवसायात अडथळा आणतो म्हणून चाकूहल्ला

बूट पॉलिश व्यवसायात अडथळा आणतो म्हणून चाकूहल्ला

Next
ठळक मुद्देबूट पॉलिश व्यवसायात अडथळा आणतो म्हणून चाकूहल्लासुभाषनगरातील प्रकार : एक जखमी; दोघांवर गुन्हा

कोल्हापूर : बूट पॉलिशच्या व्यवसायात अडथळा आणतो म्हणून एकावर चाकूहल्ला करून त्याला जखमी करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा सुभाषनगरात घडला. या घटनेत शिवाजी साताप्पा पाटील (वय ३८, रा. सुभाषनगर झोपडपट्टी, कोल्हापूर) हे जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोघा भावांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुभाषनगर झोपडपट्टीमध्ये शिवाजी पाटील हे राहात आहेत. मंगळवारी संजय गवळी व सचिन गवळी हे दोघे भाऊ तेथे आले. त्याने शिवाजीला घरातून बाहेर बोलावले. तू माझ्या बूट पॉलिशच्या व्यवसायात अडथळा का करतोस, असा त्याला जाब विचारला.

यातून वादावादीचा प्रकार घडला. त्यानंतर दोघांनी शिवाजीला शिवीगाळ करत त्याच्यावर काठी व चाकूहल्ला करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये शिवाजी पाटील हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संजय दत्तात्रय गवळी (वय ३६), सचिन दत्तात्रय गवळी (वय ३४, दोघेही रा. सुभाषनगर झोपडपट्टी) या दोघा सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नवनाथ घुगरे करीत आहेत.
 

Web Title: Knife attack as shoe polish hinders business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.