के.एम.टी.तर्फे प्रवासी दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:11 IST2021-02-20T05:11:30+5:302021-02-20T05:11:30+5:30

कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन उपक्रम (केएमटी) , अखिल भारतीय ग्राहक पंचायत, आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ...

KMT celebrates Pravasi Din with enthusiasm | के.एम.टी.तर्फे प्रवासी दिन उत्साहात साजरा

के.एम.टी.तर्फे प्रवासी दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन उपक्रम (केएमटी) , अखिल भारतीय ग्राहक पंचायत, आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी रथसप्तमी प्रवासी दिनाचे आयोजन शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे करण्यात आले. प्रारंभी के.एम.टी. बसचे पूजन करून प्रवाशांना गुलाबपुष्प आणि तिळगुळ वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सहाय्यक आयुक्त तथा अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संदीप घार्गे, ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य व प्रवासी समन्वय समितीचे सदस्य प्रसाद बुरांडे यांनी प्रवासी दिनाच्या प्रवाशांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास ग्राहक पंचायतचे कार्यवाह लक्ष्मीकांत जोशी, विनायक वाळवेकर, वर्क्स मॅनेजर अमरसिंह माने, वाहतूक निरीक्षक रवी धुपकर, भरारी पथक प्रमुख सुनील जाधव, मॅकेनिकल सुपरवायझर किरण चव्हाण, स्थानक प्रमुख नितीन पोवार, सहायक वाहतूक निरीक्षक अनिल बोरचाटे, लघुलेखक दिनेश सोमण, कसुरी विभागप्रमुख प्रदीप म्हेतर उपस्थित होते.

Web Title: KMT celebrates Pravasi Din with enthusiasm