शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दूरदृष्टीमुळेच केनवडेत जलसमृद्धी

By admin | Updated: May 24, 2016 00:50 IST

तलावात मुबलक पाणी : दहा वर्षांपूर्वीच ग्रामस्थांच्या सहकार्यातून ग्रामपंचायतीचा यशस्वी प्रयोग --जलमित्र

दत्तात्रय पाटील --म्हाकवे -सर्वत्र सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे तहान लागल्यानंतर विहीर खुदाईच्या प्रकाराप्रमाणे शासनाने आता गांभीर्याने घेत ‘जलयुक्त शिवार’ अभियान हाती घेतले आहे; परंतु तब्बल दहा वर्षांपूर्वीच केनवडे (ता. कागल) येथील ग्रामस्थांच्या सहकार्यातून ग्रामपंचायतीने हा प्रयोग यशस्वीपणे राबविला. गावच्या तलावाच्या वरच्या बाजूला पाणी स्रोतांमध्ये ठिकठिकाणी बंधारे व चरी मारून पाणी अडविले आहे. त्यामुळे डोंगर उतारावर हा तलाव असतानाही आणखी महिनाभर पाऊस नाही पडला तरीही गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. माजी सरपंच दत्ता पाटील यांची धडपड व विशेष प्रयत्न यामुळेच गावाला जलसमृद्धी लाभल्याचेही ग्रामस्थ सांगतात. १९७२ मध्ये दुष्काळी परिस्थितीत ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा परिषदेमार्फत गावच्या उत्तरेला असणाऱ्या डोंगर कपारीमध्ये पाझर तलाव बांधण्यात आला; परंतु डोंगर उतार जास्त प्रमाणात असल्यामुळे या तलावात फारसा पाणीसाठा होत नव्हता. २००३ मध्ये आमदार हसन मुश्रीफ यांचे सहकार्य आणि लघुपाटबंधारे विभागाच्या मदतीमुळे या तलावाचे भाग्यच उजळले.माजी सरपंच दत्ता पाटील यांनी पाच ते सहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर या तलावाची उंची दहा फुटाने वाढवून घेतली. तसेच तलावाच्या उत्तरेकडील भाग हा खडकाळ व डोंगराळ असल्यामुळे पावसाळ्यातील बहुतांशी पाणी ओढ्या-नाल्यातून वाहून जात असे. याचा विचार करून ११ व्या वित्त आयोगातून तलावाच्या वरील भागात चार कि.मी.च्या चरी मारण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत स्तरावरून वळण बंधारेही बांधण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी अडवून ते जिरविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. त्याची फलश्रुती आज दिसत आहे. सर्वत्र पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असताना येथील ग्रामस्थांसह त्यांच्या जनावरांना मुबलक व शुद्ध पाणी मिळत आहे. तीन हजारांहून अधिक लोकवस्तीचे हे गाव आहे. यापूर्वी पाण्यासाठी खासगी विहिरींचा तसेच कूपनलिकेचा आधार घ्यावा लागत होता; परंतु दूरदृष्टी आणि नियोजनामुळे पिण्याच्या पाण्यासह डोंगर कपारीतील १०० एकरांवरील पिकांनाही अप्रत्यक्षरीत्या मुबलक पाणी मिळत आहे. तलावाची उंची वाढविणे, जॅकवेल बांधणे, पाणी योजना, आदी विविध कामांसाठी शासन स्तरावरून या गावाला अर्धा कोटीहून अधिक निधी प्राप्त झाला आहे. दरम्यान, केनवडे गावाप्रमाणे सर्वच गावांनी याचा आदर्श घेऊन जलस्रोत वाढविला, तर गावागावांत जलसमृद्धी अवतरायला वेळ लागणार नाही.‘ मी सरपंच पदाची सूत्रे हाती घेताच राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, आदी गावांना भेटी दिल्या. त्यांनी निर्माण केलेले जलस्रोत पाहिले आणि त्याप्रमाणे आपल्याकडेही काम करता येईल याचा विचार केला आणि आज सरकार ज्या जलयुक्त शिवाराचा पाठपुरावा करीत आहे. ती संकल्पना मी दहा वर्षांपूर्वीच ग्रामस्थांच्या सहकार्यातून राबविली, त्यात यशस्वी झालो. त्याचीच फलश्रुती म्हणून आज गावात जलसमृद्धी साकारली आहे.- दत्ता पाटील-केनवडेकर, माजी सरपंच.