शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
3
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
4
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
5
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
6
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
7
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
8
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
9
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
10
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
11
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
12
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
13
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
14
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
15
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
16
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
17
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
18
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
19
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
20
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बँक नोकर भरतीचे हसन मुश्रीफ यांच्यासमोर धर्मसंकट; एकीकडे संचालकांचा तगादा, दुसरीकडे शासनाची कडक नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:05 IST

जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या केडीसीसी बँकेत गेल्या १८ वर्षांपासून नोकरभरती झालेली नाही

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीबाबत संचालकांचा पाठपुरावा सुरू आहे. पण राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या नोकरभरतीबाबत शासन अधिक दक्ष झाले असून त्यांच्या निकषांनुसारच भरतीची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. ही प्रक्रिया संचालकांना पचनी पडणार का, हे महत्त्वाचे असून बँकेची पंचवार्षिक निवडणूक तोंडावर आल्याने बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर नोकरभरतीचे धर्मसंकट उभा राहिले आहे.

जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या केडीसीसी बँकेत गेल्या १८ वर्षांपासून नोकरभरती झालेली नाही. दरम्यानच्या काळात बँकेची उलाढाल पाचपटीने वाढली आहे सध्या १९१ शाखांच्या माध्यमातून १२०० कर्मचारी आहेत. बँकेची वाढलेली उलाढाल आणि कर्मचाऱ्यांची गरज पाहता जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भरती करण्याबाबत अध्यक्ष मुश्रीफ यांनी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सूतोवाच केले होते. दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकरभरतीतील सावळागोंधळ पाहून शासनाने भरती प्रक्रिया कडक राबविण्याचा निर्णय ऑक्टोबर २०२५ मध्ये घेतला. हे करत असताना भरती प्रक्रिया राबविणाऱ्या यापूर्वीच्या पॅनलवरील कंपन्या रद्द करून नवीन तीन कंपन्यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश जिल्हा बँकांना दिले आहेत.

या कंपन्यांच्यामार्फत झालेल्या भरती प्रक्रियेत कोणाचाही हस्तक्षेप राहणार नाही केवळ गुणवत्तेनुसारच भरती होणार आहे. त्यामुळे अशाप्रकारची प्रक्रिया संचालकांना मान्य होणार का, हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे एकीकडे संचालकांचा भरतीबाबतचा तगादा दुसऱ्या बाजूला शासनाचे धोरण पाहता अध्यक्ष मुश्रीफ यांच्या समोर नोकरभरतीचे धर्मसंकट उभा राहिले आहे हे मात्र निश्चित आहे.

केडीसीसीच्या निवडणुकीनंतरच भरती

केडीसीसी बँकेची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबर २०२६ मध्ये होत आहे. तत्पूर्वी गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार आहे. अशा निवडणुकीच्या वातावरणामध्ये भरती प्रक्रिया राबविणे बँक संचालकांना अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे केडीसीसी बँकेच्या निवडणुकीनंतरच भरती प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

या कंपन्यांमार्फत भरती प्रक्रिया राबवावी लागणार

१) इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन ( आयबीपीएस).
२) टीसीएस ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस).
३.एमकेसीएल ( महाराष्ट्र नॉलेज काॅर्पोरेशन लिमिटेड)

दृष्टिक्षेपात केडीसीसी....

  • शाखा - १९१
  • मंजूर स्टापिंग पॅटर्न - १८०९
  • सध्याचे कर्मचारी - ११३०
  • रिक्त जागा - ६७९
  • ठेवी -१०६०० कोटी
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Bank Recruitment: Mushrif Faces Dilemma Amidst Pressure and Regulations.

Web Summary : Hasan Mushrif faces a dilemma regarding Kolhapur District Bank recruitment. Director pressure clashes with strict government norms. Elections loom, delaying the process.