कर्मवीर मल्टीस्टेटला ११.५० कोटींचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:22 IST2021-04-12T04:22:10+5:302021-04-12T04:22:10+5:30

जयसिंगपूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीचा एकत्रित व्यवसाय ७८५ कोटींचा झाला आहे तर चालू ...

Karmaveer Multistate makes a profit of Rs 11.50 crore | कर्मवीर मल्टीस्टेटला ११.५० कोटींचा नफा

कर्मवीर मल्टीस्टेटला ११.५० कोटींचा नफा

जयसिंगपूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीचा एकत्रित व्यवसाय ७८५ कोटींचा झाला आहे तर चालू आर्थिक वर्षात ११.५० कोटी इतका उच्चांकी ढोबळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल भोकरे यांनी दिली.

गतवर्षी महापूर व कोरोनामुळे लॉकडाऊन अशी संकटे असतानाही सभासद व ग्राहकांच्या पाठबळाने अहवाल सालात संस्थेच्या ठेवी ४६२ कोटी, तर ३२३ कोटी कर्जे वाटप झाली आहेत. संस्थेकडे ५४ कोटीचा स्वनिधी असून भांडवल पर्याप्ताचे प्रमाण पंधरा टक्के आहे. तर संस्थेने एनपीए ३ टक्के राखला आहे.

कोरोना सेंटर्सना संस्थेकडून अर्थसहाय्य करण्यात आले आहे. तसेच मयत सभासदांसाठी विमा योजनेतून १ कोटी रकमेचा लाभ सभासदांना झाला आहे. सभासदाच्या कुटुंबात मुलगी जन्मल्यास सुकन्या योजनेतून मुलीच्या नावे दहा हजार रुपयाची ठेव करण्यात येते. ज्येष्ठ सभासदांना जेष्ठाधार काठी देण्यात येते.

संस्थेच्या यशामध्ये उपाध्यक्ष रावसो पाटील, प्रा. डी. ए. पाटील, सागर चौगुले, भाऊसो सूर्यवंशी, बाबासो हुपरे, अरविंद मजलेकर, भूपाल गिरमल, आदिनाथ किणींगे, भरत गाट, सुकुमार पाटील, वि. दा. आवटी, कुमार पाटील, भाऊसो पाटील, ज्योत्स्रा नांदणे, रमेश पाटील, शिवाजी कोळी यांचे योगदान लाभले असल्याचे अध्यक्ष भोकरे यांनी सांगितले.

फोटो - ११०४२०२१-जेएवाय-०१-अनिल भोकरे

Web Title: Karmaveer Multistate makes a profit of Rs 11.50 crore