कणंगला औद्योगिक परिक्षेत्रासाठी १० हजार अभियंत्यांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST2021-01-21T04:21:57+5:302021-01-21T04:21:57+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्याच्या सीमेलगत कर्नाटकातील कणंगला (ता. हुक्केरी) येथे कर्नाटक शासनाने औद्योगिक विकासासाठी ८२२ एकर जागेमध्ये मंजुरी दिली ...

Kanang needs 10,000 engineers for industrial zone | कणंगला औद्योगिक परिक्षेत्रासाठी १० हजार अभियंत्यांची गरज

कणंगला औद्योगिक परिक्षेत्रासाठी १० हजार अभियंत्यांची गरज

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्याच्या सीमेलगत कर्नाटकातील कणंगला (ता. हुक्केरी) येथे कर्नाटक शासनाने औद्योगिक विकासासाठी ८२२ एकर जागेमध्ये मंजुरी दिली आहे. या औद्योगिक क्षेत्रासाठी १० हजार कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे, अशी माहिती कर्नाटक परिक्षेत्र विभागीय अभियंता एस. ए. कल्लुरी यांनी दिली. चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कल्लुरी म्हणाले, कणंगला औद्योगिक परिक्षेत्रासाठी पहिल्या टप्प्यातील ४५० एकर जागेमध्ये ग्रीन, यलो व रेड झोनमधील सर्व उद्योगांना बांधकाम परवाने दिले आहेत. त्यामुळे उद्योगधंदे कारखाने उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. बहुतांश कामे येत्या मार्चअखेर पूर्णत्वास येणार आहेत. अभियंत्यासाठी वसाहतीमधील कंपन्यांशी महाविद्यालय सामंजस्य करार करणार आहे. त्यामुळे सीमाभागातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यावेळी प्राचार्य डॉ. संजय सावंत, विनायक बारगे, मल्लिकार्जुन पाटील, अनिलकुमार हिरेमठ आदी उपस्थित होते.

-------------------------

* फोटो ओळी : चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात कर्नाटक परिक्षेत्र विभागीय अभियंता एस. ए. कल्लुरी यांचे प्राचार्य डॉ. संजय सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

क्रमांक : २००१२०२१-गड-०६

Web Title: Kanang needs 10,000 engineers for industrial zone