शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात कामेवाडीचा युवक ठार

By admin | Updated: November 16, 2014 00:50 IST

रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोला मोटारसायकलची धडक

कोवाड : चाकण (जिल्हा पुणे) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोला मोटारसायकलची धडक बसून झालेल्या अपघातात राजू भरमानी पाटील (वय २९, रा. कामेवाडी, ता. चंदगड) व विक्रम मनोहर डोंगळे (२४, रा. कृष्णानगर, चिखली) हे दोघे युवक ठार झाले, तर राजूचा चुलत भाऊ आशिष बळवंत पाटील हा जखमी आहे. त्याच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल, शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. यासंदर्भात माहिती अशी, राजू व आशिष हे दोघेजण अभियांत्रिकीची पदवी घेऊन नोकरी शोधण्यासाठी पुण्याला गेले होते. यावेळी त्यांचा वर्गमित्र विक्रम हाही त्यांच्याबरोबर होता. चाकण येथील औद्योगिक वसाहतीमध्ये तिघांनीही अर्ज केला होता. त्या कंपनीमध्ये मुलाखत देऊन हे तिघेही एकाच मोटारसायकलवरून परत येताना तळेगाव (चाकण) येथील खरातवाडीजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या आयशर टेम्पोला मागून मोटारसायकलची (एमएच 0९ सीएच २६४२) जोराची धडक बसल्याने विक्रम डोंगळे हा युवक जागीच ठार झाला, तर राजू पाटील याला रुग्णालयात नेत असताना त्याचे वाटेतच निधन झाले. राजू हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. वडील भरमानी पाटील यांची घरची बेताची परिस्थिती असतानाही मोठ्या जिद्दीने त्यांनी त्याला इंजिनिअर केले होते. त्यासाठी महाराष्ट्र बँकेचे शैक्षणिक कर्जही घेतले होते. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रिकामे बसण्यापेक्षा दोघेही भाऊ नोकरीसाठी पुण्याला गेले होते; पण नोकरी करण्याऐवजी काळाने त्याच्यावर घाला घातल्याने त्याचे नोकरीचे स्वप्न अधुरे राहिले. आज सायंकाळी राजूचा मृतदेह कामेवाडी येथे आणल्यानंतर रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची नोंद चाकण पोलिसांत झाली असून, दिगंबर कदम यांनी पोलिसांत वर्दी दिली आहे. (प्रतिनिधी)