शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

Jyotiba Chaitra Yatra 2026: जोतिबाची उद्या चैत्र यात्रा; भाविकांच्या गर्दीने डोंगर फुलून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:51 IST

गगनचुंबी सासनकाठ्या, गुलालाची उधळण अन् 'चांगभलं'च्या गजरात यात्रेअधीचं भक्तिभावात डोंगर न्हाऊन गेला 

पोर्ले तर्फ ठाणे : महाराष्ट्र, आंध्र प्रदेशसह कर्नाटकमधील लाखो भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या दख्खनचा राजा जोतिबा देवाची उद्या, बुधवारी (दि. १) वर्षातील सर्वांत मोठी चैत्र यात्रा होत आहे. यात्रेसाठी गेल्या दोन दिवसांपासून जोतिबा डोंगरावर लाखो भाविक दाखल झाले आहेत. गगनचुंबी सासनकाठ्या, गुलालाची उधळण आणि ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात यात्रेआधीच भक्तिभावात डोंगर न्हाऊन निघाला आहे.बुधवारी (दि. ३१) मुख्य यात्रेदिवशी जोतिबा मंदिरात पहाटे ३ वाजेपासून धार्मिक विधींना प्रारंभ होईल. ५ वाजता पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक होईल. सकाळी १० वाजता धुपारती सोहळा होईल. यात्रेचे मुख्य आकर्षण असणारी सासनकाठ्यांची मिरवणूक दुपारी १२ वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या सासनकाठीच्या पूजनाने सुरू होईल.या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान पाडळी (जि. सातारा) या सासनकाठीचा आहे. त्यानंतर मौजे विहे (ता. पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्या मानाच्या एकूण १०८ सासनकाठ्या असतात. बुधवारी हस्त नक्षत्रावर सायंकाळी ५ वाजून ४५ वाजता जोतिबाचा पालखी सोहळा सुरू होईल.तोफेच्या सलामीने पालखी जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होईल. सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांचा विवाह सोहळा होईल. रात्री ८ वाजता जोतिबाची पालखी मंदिराकडे प्रस्थान होईल, ९ वाजता पालखी मंदिरातील सदरेवर विराजमान होईल. तोफेच्या सलामीने रात्री १० वाजता पालखी सोहळा पूर्ण होईल. आरती, अंगारा वाटप झाल्यानंतर रात्री ११ वाजता देव मूर्तीस शाही स्नान होईल. रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहील.

भाविक मोठ्या संख्येने दाखलयात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आहेत. ‘चांगभलं’च्या गजराने डोंगर दुमदुमून गेला आहे. डोंगर वाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. बैलगाडी, खासगी वाहनांतून, पायी चालत भाविक जोतिबा डोंगरावर येत आहेत. बुधवारी मुख्य यात्रा झाली की भाविक परतीच्या मार्गाला लागतील.

सहजसेवाचे अन्नछत्र सुरूगायमुख येथे सहजसेवा ट्रस्टच्या अन्नछत्राला सोमवारपासून प्रारंभ झाला. दूरवरचा प्रवास करून आलेल्या भाविकांना गरमागरम मसाले भात, आमटी, भाजी आणि चविष्ट शिरा, लोणचे असा आहार दिला जात आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेता थंडगार मठ्ठा आणि थकवा घालवण्यासाठी चहाची अखंड सोय आहे. गुरुवारपर्यंत ही सेवा सुरू राहील.

English
हिंदी सारांश
Web Title : Jyotiba Chaitra Yatra 2026: Devotees Throng Hill for Grand Celebration

Web Summary : Lakhs gather for Jyotiba's Chaitra Yatra. Festivities include processions, rituals, and a marriage ceremony of deities. Devotees are offered meals and refreshments. The hill is filled with chants and devotional fervor.