जीवन साळोखे यांच्या पाच पुस्तकांचा संच प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:27 IST2021-02-09T04:27:11+5:302021-02-09T04:27:11+5:30

गेली अनेक वर्षे विविध दैनिकांतून सातत्याने साप्ताहिक सदरलेखन करणाऱ्या जीवन साळोखे यांच्या विविधांगी लेखांना वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभत ...

Jeevan Salokhe's set of five books published | जीवन साळोखे यांच्या पाच पुस्तकांचा संच प्रसिद्ध

जीवन साळोखे यांच्या पाच पुस्तकांचा संच प्रसिद्ध

गेली अनेक वर्षे विविध दैनिकांतून सातत्याने साप्ताहिक सदरलेखन करणाऱ्या जीवन साळोखे यांच्या विविधांगी लेखांना वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभत आला आहे. त्यांच्या निवडक लेखांचे ‘वेचक आणि वेधक’, ‘उघडा डोळे...बघा नीट’, ‘या जन्मावर..या जगण्यावर’ हे वैचारिक ललित लेखसंग्रह, तर ‘जेथे जातो..तेथे तू माझा सांगाती’ हा वाचन संस्कृती व ग्रंथदान उपक्रम यांचे महत्त्व विशद करणारा लेखसंग्रह आहे. ‘अस्वस्थ वर्तमानाची सावली’ हा त्यांच्या बहुचर्चित निवडक कथांचा संग्रह असून हे प्रसिद्ध होणारे त्यांचे पंचविसावे पुस्तक आहे.

जीवन साळोखे यांचे यापूर्वी पाच कवितासंग्रह, दोन कथासंग्रह आणि विविध विषयांवरील तेरा लेखसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

Web Title: Jeevan Salokhe's set of five books published