कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी मंगळवारी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली.
पुणे शिक्षक मतदारसंघातून आमदार आसगावकर यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी दत्तात्रय सावंत यांचा साडेदहा हजार मतांच्या फरकाने पराभव केला. विधिमंडळाचे अधिवेशन पुढील आठवड्यात सुरू होत आहे. तत्पूर्वी राज्यातील विधान परिषदेतील सहा नूतन सदस्यांना मंगळवारी सभापती नाईक-निंबाळकर यांनी शपथ दिली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : पुणे शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी मंगळवारी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. (फोटो-०८१२२०२०-कोल-आसगावकर)
- राजाराम लोंढे