शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षार्थी विद्यार्थी कोरोनाबाधित न होणे हे मोठे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:45 IST

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पर्याय नसल्याने महाविद्यालयीन परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, साडेतीन लाख परीक्षार्थी आठवेळा केंद्रावर आले; ...

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पर्याय नसल्याने महाविद्यालयीन परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, साडेतीन लाख परीक्षार्थी आठवेळा केंद्रावर आले; परंतु यातील कोणाही विद्यार्थ्यांना कोरोना झाला नाही हे महाविकास आघाडीचे मोठे यश आहे, असा दावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला.

येथील सायबर महाविद्यालयातील डेटा सेंटर आणि राधाबाई ग्लोबल इंग्लिश स्कूलच्या इमारत उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सामंत म्हणाले, ६ एप्रिल २० रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेऊ नका, असे पत्र दिले. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. प्रसंगी पक्षीय नुकसान झाले तरी चालेल; परंतु पालक, विद्यार्थी, शिक्षक या सर्वांच्या भावना समजून निर्णय घ्या, अशा सूचना त्यांनी दिल्या. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मंत्री आपल्या दारी उपक्रमांर्तगत अनुकंपा योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी पाठवू म्हणून इशारा दिला. महाविद्यालयाला आवश्यक तो निधी दिला जाईल आणि पाच वर्षे आम्ही राहणार असल्याने त्याची काळजी करू नका.

आमदार जयंत आसगावकर म्हणाले, महाराष्ट्रातील वाणिज्य आणि व्यवस्थापनातील एक नामवंत शिक्षण संस्था म्हणून सायबरचा उल्लेख केला जातो. याचा आम्हांला अभिमान आहे. डॉ. टी. ए. शिवारे यांनी संस्थेचा परिचय करून दिला.

श्रीपतराव शिंदे म्हणाले, आमचे वडील दिनकर मास्तर यांनी किमान ग्रामीण भागातील मुलांना प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून शाळा सुरू केल्या, तर बंधू ए. डी. शिंदे यांनी वाणिज्य विषयातील शिक्षण देण्यासाठी ही संस्था सुरू केली.

संस्थेचे सचिव डॉ. आर. ए. शिंदे यांनी आभार मानले. डॉ. सी. एस. दळवी यांनी स्वागत केले. यावेळी विश्वस्त ऋषिकेश शिंदे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय कोले, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे, सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर, ॲड. सुरेश कुराडे, डॉ. ए. आर. कुलकर्णी, अनुजा वणकुद्रे उपस्थित होत्या. डॉ. एस. एस. आपटे, अनुराधा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

परीक्षा रद्द करणारा मंत्री

गेल्यावर्षी युवक वर्गात माझी लोकप्रियता खूपच वाढली. दौऱ्यावर असताना अनेक युवक भेटायला यायचे. तुम्ही परीक्षा रद्द करून चांगला निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन करायचे. परीक्षा रद्द करणारा मंत्री म्हणून माझी प्रतिमा करू नका, असे मी त्यांना सांगायचो. कारण यापुढे परीक्षा होणारच आहेत. मात्र, त्या ऑफलाईन की ऑनलाईन याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहे.

२००२२०२१ कोल सायबर

कोल्हापुरातील सायबरच्या राधाबाई इंग्लिश मेडियम स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी डावीकडून ऋषिकेश शिंदे, श्रीपतराव शिंदे, आमदार जयंत आसगावकर, डॉ. टी. ए. शिवारे, सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर, डॉ. आर. ए. शिंदे, ॲड. सुरेश कुराडे, डॉ. सी. एस. दळवी उपस्थित होते. छाया.. आदित्य वेल्हाळ