शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरचा प्रतीक कुंभार निघाला विमानाने दिल्लीला

By admin | Updated: June 24, 2015 00:43 IST

लोकमत’ संस्कारांचे मोती स्पर्धेतून निवड

इस्लामपूर : ‘लोकमत’च्या ‘संस्कारांचे मोती : ग्रीन किडस्’ स्पर्धेतून ‘मुंबई-दिल्ली-मुंबई’ या मानाच्या हवाई सफरीसाठी इस्लामपूर हायस्कूलच्या प्रतीक कैलासनाथ कुंभार या सहावीतील विद्यार्थ्याची निवड झाली. सांगली जिल्ह्यातून निवड झालेला प्रतीक हा एकमेव विद्यार्थी आहे. या निवडीने शाळेतील गुरुजन आणि विद्यार्थ्यांनी मंगळवारी त्याचा जल्लोषात सत्कार केला.‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे १ जुलै ते ११ आॅक्टोबर २०१४ दरम्यान ‘संस्कारांचे मोती : ग्रीन किडस्’ ही सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत सांगली जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रतीकची हवाई सफरीसाठी निवड झाली. निवडीचे वृत्त त्याच्या कुटुंबियांना समजताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रतीक विमानाने प्रवास करणार, ही बातमी त्यांच्यासाठी आनंद व अभिमानाची ठरली. मंगळवारी इस्लामपूर हायस्कूलमध्ये ‘लोकमत’ परिवारातर्फे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एस. के. कुलकर्णी, मुख्याध्यापक ए. आर. खटावकर यांच्याहस्ते प्रतीकचा सत्कार केला.यावेळी खटावकर म्हणाले की, शाळेचे नाव देशाच्या राजधानीत पोहोचवून प्रतीक मान्यवरांना ‘अमृतकुंभ’ हा ग्रंथ भेट देईल. (वार्ताहर)आनंद अन् अभिमानही...मूळचे वेजेगाव (ता. खानापूर) येथील प्रतीकचे वडील कैलासनाथ कुंभार एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागात सेवेत आहेत. प्रतीकच्या हवाई सफरीचा आनंद व अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले, तर आई सौ. छाया कुंभार म्हणाल्या की, प्रतीक आणि प्रथमेश ही जुळी भावंडे आहेत. प्रतीकच्या निवडीनंतर त्यानेही हवाई सफरीचा हट्ट धरला. यापूर्वी मुलगी पल्लवीनेही ‘लोकमत’च्या संस्काराच्या मोतीचे पारितोषिक पटकावले आहे.