शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

By admin | Updated: August 25, 2015 23:57 IST

शेअर बाजार : ‘वेट अँड वॉच’च्या सावध पवित्र्यात, गुंतवणूकदारांनी निराशा टाळावी

कोल्हापूर : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मंगळवारी १६२५ अंशांनी घसरल्यामुळे कोल्हापूर शहरातील गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. बाजारात आणखी घसरण होण्याच्या भीतीने इंट्रा डे व्यवहार करणाऱ्यांनी खरेदीला मंगळवारी थंडा प्रतिसाद दिला. कोल्हापूर शहरात शेअर ब्रोकरेजमध्ये काम करणाऱ्या अँजेल ब्रोकिंग, जॉर्इंड्रे, कार्वे, निर्मल बंग, आनंद राठी, ओसवाल सिक्युरिटीज, ट्रेडनेट, आदींसह सुमारे पन्नास कंपन्यांचे सबब्रोकर्स आहेत. बहुतांश कंपन्या या मुंबईतील आहेत. राजारामपुरी, शाहूपुरी, ताराबाई पार्क, मंगळवार पेठ या परिसरात सबब्रोकर्स आहेत. शेअर बाजारामध्ये इंट्रा डे व्यवहार करणाऱ्यांची संख्या जास्त असून, यामध्ये डॉक्टर्स, इंजिनिअर, व्यापारी आणि नोकरदारांची संख्या लक्षणीय आहे. पण सोमवारी (दि. २४) झालेल्या तीन वर्षांतील सर्वांत मोठ्या गुंतवणुकीने इंट्रा डेमधील गुंतवणूकदार सावध झाले आहेत. गुंतवणूकदार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे चित्र दिवसभरात दिसून आले; पण शेअर बाजारातील ही घसरण सरसकट नसते. शेअर बाजारात नोंदणी झालेल्या एकूण शेअरमध्ये झालेली ही घसरण असते. ती कंपनीनिहाय कमी-जास्त असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी निराश होऊ नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेअर बाजारातील तीन वर्षांतील ही सर्वांत मोठी घसरण असली तरी गुंतवणूकदारांनी निराश होण्याचे कारण नाही. इंट्रा डे ट्रेडिंगऐवजी लाँग टर्ममधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. या गुंतवणुकीतून मिळालेला नफा करमुक्त असतो. शेअर बाजारात इंट्रा डे ट्रेडिंगऐवजी लाँग टर्म गुंतवणूक फायदेशीर ठरते. २००८ साली टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेसने प्रत्येकी ८५० किमतीचे शेअर्स बाजारात व्रिकीसाठी आणले होते. आजमितीस या शेअर्सची किंमत चौपट झाली आहे. याशिवाय कंपनीने दहा हजार रुपयांचा लाभांशही दिलेला आहे. - मनीष झंवर - इन्व्हेस्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष