शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या चार पदाधिकाऱ्यांचा परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST

सभापती, बांधकाम आणि आरोग्य समिती तळाशीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव गुरुजी यांच्या सूनबाई असलेल्या वंदना जाधव यांचे शिक्षण ...

सभापती, बांधकाम आणि आरोग्य समिती

तळाशीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव गुरुजी यांच्या सूनबाई असलेल्या वंदना जाधव यांचे शिक्षण एम.ए.बी.एड्‌. इतके झाले आहे. शाहूवाडी तालुक्यातील चरण हे त्यांचे माहेर असून कसबा वाळवे मतदारसंघातून त्या निवडून आल्या. २००७ ते २००९ या काळात त्यांनी राधानगरीच्या सभापती म्हणून काम पाहिले. गोकुळच्या निवडणुकीत आबिटकर यांनी विरोधी गटाला पाठिंबा देताना जाधव यांना पद देण्याचा शब्द पालकमंत्र्यांनी दिला होता.

रसिका अमर पाटील

सभापती, शिक्षण व अर्थ समिती

ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील यांच्या पुतण्याची पत्नी म्हणजेच सूनबाई असलेल्या रसिका पाटील यांचे शिक्षण बी.कॉम.पर्यंत झाले आहे. शे. का. पक्षाचे कार्यकर्ते संभाजीराव जगदाळे यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे समाजकार्याचे बाळकडू घरातूनच मिळाले. काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नसल्याने शिंगणापूर मतदारसंघातून त्या अपक्ष म्हणून ईर्षेने निवडून आल्या. पती अमर पाटील हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे खंदे समर्थक असून पदाधिकारी बदलामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

- शिवानी विजयसिंह भोसले

सभापती, महिला आणि बालकल्याण समिती

बी.ए.पर्यंत शिक्षण झालेल्या शिवानी भोसले यांचे माहेर बेळगाव. नानीबाई चिखली मतदारसंघातून त्या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या संचालिका म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मंडलिक गटाच्या कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे.

कोमल सरदार मिसाळ

सभापती, समाजकल्याण समिती

करवीर तालुक्यातील वडणगेच्या असलेल्या मिसाळ यांचे वळिवडे हे माहेर. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या कोमल यांचे पती सरदार हे शिवसेनेचे हाडाचे कार्यकर्ते आहेत. सरदार यांनी करवीर पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे कट्टर समर्थक असलेले मिसाळ हे समाजकारणासाठी पूर्णवेळ देतात. त्याचा फायदा कोमल यांना झाला.