खासदारांचा नंबर काढणारी ही तर ‘आंतरराष्ट्रीय संस्था’

By Admin | Updated: September 4, 2016 01:21 IST2016-09-04T01:17:32+5:302016-09-04T01:21:47+5:30

महाडिक यांचा पलटवार : सतेज पाटील यांना दिले प्रत्युत्तर

The 'International Organization' | खासदारांचा नंबर काढणारी ही तर ‘आंतरराष्ट्रीय संस्था’

खासदारांचा नंबर काढणारी ही तर ‘आंतरराष्ट्रीय संस्था’

कोल्हापूर : खासदारांचा नंबर काढणारी आंतरराष्ट्रीय संस्था आता कोल्हापुरात असल्याचा पलटवार खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी केला. आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी केलेल्या वक्तव्यावर ज्यांच्या बाबतीत ही टिप्पणी झाली होती, त्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीतच महाडिक यांनी परतफेड करून टाकली.
शुक्रवारी सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात पाटील यांच्या एसपीएन या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी स्वत. सतेज पाटील व खासदार संभाजीराजे उपस्थित होते. यावेळी सतेज पाटील यांनी कुणीही कितीही प्रश्न विचारले तरी राजे तुम्ही जनतेच्या मनातील एक नंबरचे खासदार आहात, नुसते प्रश्र्न मांडून उपयोग काय, त्यातील सुटले किती अशी टीका खासदार महाडिक यांचे नांव न घेता केली होती.त्याचवेळी संभाजीराजे यांचे मात्र तोंडभरून कौतुक केले होते. शनिवारी सकाळी शाहू स्मारक भवनमध्ये सराफ संघ व धातू प्रबोधिनीच्या कार्यक्रमात महाडिक व संभाजीराजे एकत्र होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे महाडिक यांनी या विषयाला हात घातला. ते म्हणाले, खासदार म्हणून निवडून आल्यानंतर जाणीवपूर्वक प्रभावीपणे काम केले, म्हणूनच प्टॉप थ्री खासदारांमध्ये निवड झाली. ही निवड देशपातळीवरील संस्थेने केलेल्या मूल्यांकनातून झाली आहे. मात्र, संभाजीराजेंना कालच एक नंबरचा खासदार म्हणून घोषित करण्यात आले. त्यांचे मूल्यांकन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोल्हापुरातील आहे, असा टोला सतेज पाटील यांचे नाव न घेता महाडिक यांनी यावेळी लगावला


केशवराव भोसले शुक्रवारी नाट्यगृहात आमदार सतेज पाटील यांनी खासदार संभाजीराजे यांचे कौतुक करताना अप्रत्यक्षपणे धनंजय महाडिक यांच्यावर टीका केली होती, तर त्याला प्रत्युत्तर देताना महाडिक यांनी शनिवारी आमदार सतेज पाटील यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यांनीही संभाजीराजे यांची काम करण्याची धडपड चांगली असल्याचीही पुस्ती त्यांनी जोडली.

Web Title: The 'International Organization'