शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

आंतरधर्मीय लग्न केलेल्या दाम्पत्याची कोंडी

By admin | Updated: March 10, 2017 23:36 IST

मदतीचे आवाहन : बिलासाठी थांबला डिस्चार्ज

कोल्हापूर : मुलगी लिंगायत वाणी तर मुलगा नवबौद्ध समाजातील. मूळ गाव सांगली जिल्ह्यातील. वर्षभरापूर्वी त्यांनी कुटुंबांचा विरोध डावलून लग्न केले. त्यांना नुकतीच गोंडस कन्या झाली आहे. ती येथील राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील जानकी हॉस्पिटलमध्ये आहे; परंतु दवाखान्याचे बिल द्यायला पैसे नसल्याने त्यांना डिस्चार्ज घेणे अवघड बनले आहे. ‘तोंडावर होळीचा सण आहे, आम्ही कधी हो जाणार गावी’ अशी ती ओली बाळंतीण सर्वांना विचारत आहे. या कुटुंबाला कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने दहा हजारांची मदत केली आहे. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन येथील आंतरधर्मीय विवाह संस्थेतर्फे मेघा पानसरे यांनी केले आहे.मुलाच्या वडिलांनी भाचीला सून करून आणायचे ठरविल्याने त्यांचाही या लग्नास विरोध होता. मुलीचे कुटुंबीय तर एकदमच विरोधात. त्यांनी पळून जाऊन लग्न केले. मुलगा रंगारीची कामे करतो. काम मिळेल त्या गावात खोली घेऊन राहायचे, असा त्यांचा संसार. गेली वर्षभर ते बत्तीस शिराळ््यात राहतात. पत्नी गरोदर झाल्यावर त्यांनी स्थानिक रुग्णालयात प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली. त्यामध्ये या महिलेस काविळ असल्याचे स्पष्ट झाले तेथून ते बांबवडे येथे खुटाळे रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी पुढील उपचारासाठी येथील जानकी हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठविले. या महिलेची २५ फेब्रुवारीस प्रसूती झाली व तिला मुलगी झाली. बालिकेची प्रकृती चांगली आहे. परंतु आईस काविळ झाल्याने तिच्यावर उपचार केले. त्यामुळे रुग्णालयाचे बिल ४८ हजार रुपयांवर गेले आहे. त्यांची परिस्थिती माहीत झाल्यामुळे रुग्णालयाने पाच हजार रुपये कमी केले. तिच्या पतीने मित्रमंडळी व कामाच्या लोकांकडून काही रक्कम उभी केली आहे. परंतु ती पुरेशी नाही. पैसे देता येत नाही म्हणून त्यांना डिस्चार्ज घेता आलेला नाही. बाळंतिणीजवळ ओळखीची महिला रोजगार बुडवून राहिली आहे. त्यांनाही घरी जायचे आहे. विवाहास विरोध असल्याने दोन्ही कुटुंबे मदत करायला तयार नाहीत. आंतरधर्मीय विवाह केंद्रामार्फतही काही निधी गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.