शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांचा सोशल मिडीयावर जोर -प्रचार आत्तापासूनच सुरु

By admin | Updated: July 30, 2014 00:31 IST

मिळणाऱ्या हिटस् व प्रतिक्रिया सावध लक्ष

संतोष पाटील -  कोल्हापूर ,, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा विकास करण्यास कसे योग्य उमेदवार आहोत, याचा आतापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून इच्छुकांनी प्रचार सुरू केला आहे. तरुणाईचे डोके सोशल मीडियातून वर येत नाही, तर समाजातील ‘मत’ बनवू शकणारा मोठा घटक सातत्याने सोशल मीडियाशी जोडून आहे. आमदारकीच्या स्वप्नाला बळ मिळावे, यासाठी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांसह कार्यकर्त्यांचे ‘फेसबुक’, ‘वॉटस् अ‍ॅप’सारखी माध्यमातील वावर वाढला आहे. कोल्हापुरातील एकूण लोकसंख्येपैकी १२,३०,००९ लोक शहरी भागात राहतात. एकूण लोकसंख्येच्या ३१.७३ टक्के शहरात, तर ग्रामीण भागात ६८.२७ टक्के लोक राहतात. शहरी भागात शिक्षित लोकांचे प्रमाण ८८.२८ टक्के आहे. ग्रामीण भागात ७८.३५ टक्केआहे. गेल्या दोन वर्षांत शहरीभागाच्या बरोबरीने इंटरनेटचा वापर होऊ लागला आहे. दरवर्षी किमान २० टक्के लोक नव्याने जोडले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभाव प्रकर्षाने जाणवल्यानंतर संगणकीय ज्ञानात कच्चे असणाऱ्या नेत्यांनी खास तज्ज्ञांना यासाठी पाचारण केले आहे. सकाळी उठल्यापासून दिवसभरातील घडामोडी फेसबुक व वॉटस्अ‍ॅपच्या गु्रपवर शेअर केल्या जात आहेत. सोशल मीडियावरून येणाऱ्या सूचना व समस्या सोडविण्यासाठी अनेकांनी स्वतंत्र पथकच तयार ठेवले आहे. केलेले आंदोलन, मोर्चा, विकासकामे, आवाहन, सोडविलेल्या समस्या, आदी तातडीने अपडेट केल्या जात आहेत. नेत्यांची कनेक्टिव्हिटी..............-गृहराज्यमंत्री सतेज पाटील ‘वॉटस् अ‍ॅप’वर बाराशे लोकांशी सातत्याने कनेक्ट, फेसबुकवर दर दोन तासांची ‘अपडेट’-खासदार राजू शेट्टींच्या ‘उसाचा दर किती असावा? ’ यास विक्रमी ५७ हजार कॉमेंटस्-खासदार शेट्टी यांच्या दररोज फेसबुकवर ताज्या घडामोडी अपलोड, ग्रामीण भागासह शहरी तरुणांचा वाढता पाठिंबा-आमदार सुरेश हाळवणकर यांची फेसबुकवर चार पेजसह २५ हजार फ्रेंडलिस्ट-फौंडेशनच्या माध्यमातून कामगारमंत्री हसन मुश्रीफ ‘कनेक्ट’-आमदार राजेश क्षीरसागर यांचे फेसबुकवर तीन पेजसह२२ हजार फ्रेंडलिस्ट, वॉटस्अ‍ॅपवर दहाहून अधिक ग्रुप-खासदार धनंजय महाडिक सातत्याने संपकर् ाबरोबरच संसदेतील भाषणे वॉटस्अ‍ॅप ग्रुपवर अपलोड करतात.-विनय कोरे जनसुराज्य फौंडेशन पेजला वाढता प्रतिसाद-आमदार डॉ. सुजित मिणचेकर, संजय पवार, राजीव आवळे, सत्यजित पाटील, नरगसेवक सत्यजित कदम, संजय घाटगेंचा वावर वाढला.