१५० कर्मचाऱ्यांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST2021-05-23T04:24:51+5:302021-05-23T04:24:51+5:30

कोल्हापूर : येथील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्स आणि पल्लवी प्रीतम शहा यांच्यातर्फे ...

Insurance for 150 employees | १५० कर्मचाऱ्यांचा विमा

१५० कर्मचाऱ्यांचा विमा

कोल्हापूर : येथील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्स आणि पल्लवी प्रीतम शहा यांच्यातर्फे पंचगंगा स्मशानभूमी, अग्निशमन, शववाहिका व रुग्णवाहिकाकडे सेवा देणाऱ्या १५० कर्मचाऱ्यांचा विमा उतरविण्यात आला. विम्यापोटी संबंधित कर्मचाऱ्यांना ५० हजारांपर्यंत वैद्यकीय बिल मिळणार आहेत. याचा फायदा कर्मचारी व्यक्तिगत त्यांच्या कुटुंबीयांसाठी होणार आहे. या विमा पॉलिसीच्या फायली संबंधित कर्मचारी यांना प्रदान करण्यात आल्या.

यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन संग्राम पाटील, उपायुक्त रविकांत आडसूळ, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष अनिकेत अष्टेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, सचिन लाड, पल्लवी शहा, रोट्रॅक्ट मिडटाऊन फिनिक्स अध्यक्ष निखिल कोळी, आदी उपस्थित होते.

Web Title: Insurance for 150 employees