शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

सी, डी वॉर्डात अपुरा पाणीपुरवठा; गळती काढली

By admin | Updated: August 23, 2015 17:53 IST

आजपासून पाणीपुरवठा पूर्ववत : पाण्यासाठी नागरीकांची तारंबळ

कोल्हापूर : रंकाळवेस बसस्थानक परिसरातील जुन्या काळातील ७०० एमएम जाडीच्या जलवाहिनीला लागलेली गळती काढण्यात अखेर शनिवारी रात्री उशिरा पाणीपुरवठा विभागाला यश आले. गळती काढण्यासाठी या जलवाहिनीचा पाणीपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आला होता. जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्याने रविवारपासून पूर्ववत पाणीपुरवठा होईल, असे सांगण्यात आले. बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या चंबुखडी पाण्याच्या टाकीपासून रंकाळवेसमार्गे शाहूपुरीपर्यंत ७०० एमएम जाडीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी खूप जुनी असून ती खराब झाली आहे. रंकाळा बसस्थानक परिसरात या जलवाहिनीला गळती लागली होती. ती गुरुवारी रात्रीपर्यंत दुरुस्त करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पूर्ववत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला परंतु याच जलवाहिनीला थोड्याच अंतरावर आणखी एक मोठी गळती लागली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुन्हा खुदाई करून गळती असलेल्या जलवाहिनीचा शोध घेण्यात आला. शनिवारी दिवसभर गळती काढण्याचे काम सुरू होते. सायंकाळी ते पूर्ण झाले. चंबुखडीहून आणलेली ही जलवाहिनी अत्यंत जुनी असल्याने वाहनांमुळे रस्त्यावर पडणाऱ्या दाबामुळे ती फुटली. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे आता रविवारपासून सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात अन्य मार्गावरून सी व डी वॉर्डाला पाणीपुरवठा करण्यात आला, परंतु त्याला पुरेसा दाब नव्हता. कमी व अपुरा दाबाने पाणीपुरवठा झाला. (प्रतिनिधी)