Kolhapur: ‘गोकुळ’ठरावासाठी मुश्रीफ यांच्याकडून जोडण्या, जास्तीत जास्त ठराव गोळा करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 18:22 IST2026-03-04T18:21:25+5:302026-03-04T18:22:48+5:30

‘महायुती’म्हणूनच लढणार

Instructions to collect maximum number of resolutions from Hasan Mushrif for Gokul resolution | Kolhapur: ‘गोकुळ’ठरावासाठी मुश्रीफ यांच्याकडून जोडण्या, जास्तीत जास्त ठराव गोळा करण्याच्या सूचना

Kolhapur: ‘गोकुळ’ठरावासाठी मुश्रीफ यांच्याकडून जोडण्या, जास्तीत जास्त ठराव गोळा करण्याच्या सूचना

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून ठरावासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या जोडण्या वेगावल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेत बैठक घेऊन बाराही तालुक्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

सोमवारी (दि. ९) दुग्ध विभागाकडून ठरावाची प्रत दूध संस्थांना पाठविली जाणार आहे. त्यानंतर संबंधित संस्थांशी संपर्क साधून आपल्याशी संबंधित व्यक्तीच्या नावावर ठराव करत असताना तालुक्यातील जास्तीत जास्त ठराव गोळा करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.

दुग्ध विभागाने ठराव मागण्याची तयारी केली असून सोमवारपासून संघाशी संलग्न प्राथमिक दूध संस्थांकडे ठराव मागविले जाणार आहेत. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांनी बुधवारी जिल्हा बँकेत ‘गोकुळ’शी संबंधित नेते, संचालक व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. विशेष म्हणजे मंत्री मुश्रीफ यांनी प्रत्येक तालुकानिहाय स्वतंत्रपणे माहिती घेतली.

बैठकीला माजी आमदार के. पी. पाटील, राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, प्रा. किसन चौगले, युवराज पाटील, बाळासाहेब खाडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, सुधीर देसाई, वसंतराव धुरे, विश्वासराव इंगवले आदी उपस्थित होते.

संचालकांत चढाओढ

‘गोकुळ’च्या विद्यमान संचालकांनी संस्थाचालकांशी थेट संपर्क सुरू केला आहे. ठराव आपल्याकडेच द्या, अशी विनंती ते संस्थाचालकांना करू लागले आहेत. जास्तीत जास्त ठराव गोळा करण्यासाठी संचालकांमध्ये चढाओढ पाहावयास मिळत आहे.

महायुती’म्हणूनच लढणार

‘गोकुळ’च्या ठरावांचा मुश्रीफ यांनी तालुकानिहाय आढावा घेतानाच ही निवडणूक महायुती म्हणूनच लढायची आहे. त्यादृष्टीने वाटचाल ठेवत ठराव गोळा करण्याची सूचना मंत्री मुश्रीफ यांनी दिल्याचे समजते.

Web Title : मुश्रीफ ने गोकुल चुनाव के लिए रणनीति बनाई, अधिकतम संकल्प संग्रह का आग्रह किया।

Web Summary : मंत्री मुश्रीफ ने आगामी गोकुल दूध संघ चुनाव के लिए रणनीति बनाने के लिए एक बैठक बुलाई। उन्होंने पार्टी पदाधिकारियों को अपने उम्मीदवारों का समर्थन करने वाले अधिकतम संकल्पों को इकट्ठा करने का निर्देश दिया। चुनाव में जीत सुनिश्चित करने के लिए गठबंधन और रणनीतियाँ बनाई जा रही हैं।

Web Title : Mushrif strategizes for Gokul election, urges maximum resolution collection.

Web Summary : Minister Mushrif convened a meeting to strategize for the upcoming Gokul milk union election. He instructed party officials to gather maximum resolutions supporting their candidates. Alliances and strategies are being formed to secure victory in the election.