शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य नागरिकाप्रमाणे रस्त्याची पाहणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:31 IST

कोल्हापूर : दुचाकी, चारचाकीने प्रवास करून सामान्य नागरिकाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करावी. रस्ता सुरक्षेबाबत दक्ष रहावे, ...

कोल्हापूर : दुचाकी, चारचाकीने प्रवास करून सामान्य नागरिकाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करावी. रस्ता सुरक्षेबाबत दक्ष रहावे, अशा विविध कडक सूचना सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. एस. माने यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

येथील शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात सार्वजनिक बांधकाम मंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३२ व्या रस्ता सुरक्षा कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. रस्त्यांवरील खड्डे भरणे, रंगरंगोटी करणे आदी स्वरूपातील कामे पीडब्ल्यूडी म्यॅनुअलप्रमाणे करावीत, त्याचा आढावा घ्यावा, असलेल्या रस्त्याला गुणवत्तापूर्ण करावे, ब्लॅक स्पॉटबाबत तालुकास्तरीय समितीकडून माहिती घेऊन काम करावे, साईटवर जाऊन पाहणी केली पाहिजे, अशा सूचना एस. एस. माने यांनी अधिकाऱ्यांना केल्या. ट्रेनि इंजिनिअर म्हणून नेमणुकीवेळीच मला रस्ता सुरक्षेबाबतचे प्रशिक्षण दिले असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे कार्यकारी अभियंता एस. डी. सोनवणे, तुषार बुरूड, संजय काटकर (कोल्हापूर), सुजित काटकर (सांगली) आदी उपस्थित होते.

चौकट

‘स्पीडब्रेकर’वर जास्त अपघात

मागीलवर्षी स्पीडब्रेकरवर जास्त अपघात घडले आहेत. उंच स्पीडब्रेकर घातक आहेत. या ब्रेकरवर पट्टे मारणे ही शुल्लक गोष्ट आहे. पण, ती अपेक्षित वेगाने होत नाही. वाहकांच्या चुकांमुळे अपघात होतात. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यास्तरीय कन्सलटंट-इंजिनिअर-वकील’अशी समिती नेमली असल्याचे माने यांनी सांगितले.

एस. एस. माने म्हणाले

शून्य टक्के अपघात होणे म्हणजे आपण यशस्वी झाल्याचे समजावे.

शासनाकडून आलेल्या निधी व्यवस्थित वापरावा.

ठेकेदाराकडून रस्त्यावरील खड्डे वारंवार भरून घ्यावेत.

गावांजवळ झेब्रा क्रॉसिंग, साईन बोर्ड लावा.

गावाच्या दोन्ही बाजूला पट्टे मारा, आतील रस्त्यावर स्पीडब्रेकर करून त्यावर कॅटेज मारा.

फोटो (२४०२२०२१-कोल-रस्ता सुरक्षा कार्यक्रम) : कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम मंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३२ व्या रस्ता सुरक्षा महिना कार्यक्रमामध्ये सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. एस. माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी स्नेहा गिरी, रोहित काटकर आदी उपस्थित होते.