सायफन पाणी योजनांच्या नुकसानाची पाहणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST2021-08-26T04:27:32+5:302021-08-26T04:27:32+5:30

शिंपी म्हणाले की, सध्या सर्व नदीवरील पाणी योजनांचे सर्वेक्षण सुरू आहे; परंतु त्याचबरोबरीने सायफन योजनांच्या नुकसानाचेही सर्वेक्षण होण्याची गरज ...

Inspect the damage to siphon water schemes | सायफन पाणी योजनांच्या नुकसानाची पाहणी करा

सायफन पाणी योजनांच्या नुकसानाची पाहणी करा

शिंपी म्हणाले की, सध्या सर्व नदीवरील पाणी योजनांचे सर्वेक्षण सुरू आहे; परंतु त्याचबरोबरीने सायफन योजनांच्या नुकसानाचेही सर्वेक्षण होण्याची गरज आहे. कारण चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांमध्ये किमान २०० हून अधिक सायफन पद्धतीच्या योजना आहेत. अतिवृष्टीमुळे माती वाहून गेल्यामुळे या योजनांचे विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. जेथून पाणी येते तेथील टाक्या फुटणे, बांधकामाला तडे जाणे, पाइपलाइन तुटणे अशासारखे प्रकार झाले आहेत. याचे सर्वेक्षण हेाऊन दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्याची गरज आहे.

त्यामुळेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक ढाेंगे यांना सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा ग्रामपंचायतींनीही तातडीने आपापल्या पंचायत समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन शिंपी यांनी केले आहे.

Web Title: Inspect the damage to siphon water schemes