शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

कलबुर्गी हत्याप्रकरणी दोघांची चौकशी

By admin | Updated: September 5, 2015 00:20 IST

यांना ताब्यात घेतल्यामुळे कलबुर्गी यांच्या हत्त्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बेळगाव : ज्येष्ठ विचारवंत व माजी कुलगुरु डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणी बेळगाव कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री यांच्यासह कन्नड युवा वेदिकेचे अध्यक्ष अनंत ब्याकूड यांची शुक्रवारी पोलिसांनी कसून चौकशी केली. बजंत्री व ब्याकूड यांचे अनैतिक संबंध जाहीर करूनयेत, यासाठी ब्याकूडने कलबुर्गी यांना धमकी दिल्यामुळे त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर व ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्त्येच्या अनुषंगाने तपास करणाऱ्या कर्नाटक सीआयडी पोलिसांनी बजंत्री व ब्याकूड यांना ताब्यात घेतल्यामुळे कलबुर्गी यांच्या हत्त्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कर्नाटकच्या सांस्कृतिक उपसंचालिका बजंत्री (धारवाड) व कन्नड युवा वेदिकेचे अध्यक्ष ब्याकूड (मूळ गाव रायबाग, सध्या रा. बेळगाव) यांचे अनैतिक संबंध आहेत. बेळगाव येथील कुमार गंधर्व रंग मंदिरात अश्लील चाळे करताना त्यांना डॉ. कलबुर्गी यांनी रंगेहात पकडले होते. या अनैतिक संबंधांबाबत कुठेही वाच्यता करू नये, यासाठी ब्याकूडने कलबुर्गी यांना धमकी दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, बजंत्री यांची मंगलोरला बदली झाली होती. मात्र, पुन्हा त्या बेळगावला रुजू झाल्या होत्या. याबाबतची माहिती सीआयडी पोलिसांना मिळाल्यामुळे त्यांनी या दोघांनाही चौकशीसाठी शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतले होते. दिवसभर त्यांची सखोल चौकशी सुरू होती. ब्याकूडचे वडील कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त पांडुरंग राणे  व ‘सीआयडी’चे बंगलोर पोलीसप्रमुख एस. राजाप्पा दिवसभर बजंत्री व ब्याकूड यांची चौकशी करीत होते. (प्रतिनिधी)