शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांतून उद्योगक्षेत्राच्या समस्या मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशातील ४९ महाविद्यालयांना आयडिया डेव्हलपमेंट इव्हॅल्युएशन ॲप्लिकेशन (आयडिया) लॅॅब ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशातील ४९ महाविद्यालयांना आयडिया डेव्हलपमेंट इव्हॅल्युएशन ॲप्लिकेशन (आयडिया) लॅॅब स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार कोल्हापुरातील केआयटी महाविद्यालयामध्ये ‘आयडिया लॅब’ साकारण्यात येणार आहे. या लॅबची संकल्पना, त्यातून विद्यार्थी, शिक्षक आणि कोल्हापूरच्या उद्योगक्षेत्राला कोणता उपयोग होणार, आदींबाबत या लॅबचे समन्वयक डॉ. शिवलिंग पिसे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.

प्रश्न : आयडिया लॅबची संकल्पना काय आहे?

उत्तर : कौशल्य विकासासह आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल याला बळ देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषेदेने आयडिया लॅबचे पाऊल टाकले आहे. या परिषेदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी पुणे इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक असताना त्याठिकाणी फॅॅबलॅब उभी केली. त्याद्वारे तेथील विद्यार्थ्यांनी स्वकल्पनेतून काही उत्पादने निर्माण केली. त्यातील नॅनो सॅटेलाईटचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी कौतुक केले होते. या ‘फॅबलॅब’च्या धर्तीवर एआयसीटीईने आयडिया लॅब ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. या लॅबमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पना या उत्पादनांमध्ये रूपांतरित होण्यासाठी आवश्यक असणारी व्यवस्था उभारणे, नवसंकल्पनांच्या माध्यमातून उद्योगक्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा उद्देश आहे.

प्रश्न : या लॅबमध्ये कोणत्या सुविधा असणार आहेत?

उत्तर : उद्योग, व्यवसाय, संशोधन आणि विकास आदी क्षेत्रांना उपयुक्त ठरणारे कोणत्याही स्वरूपातील प्रोटोटाईप तयार करण्यासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक यंत्रसाम्रगी केआयटी महाविद्यालयामधील या आयडिया लॅबमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यात थ्रीडी प्रिंटर, थ्रीडी स्कॅनर, हायड्रॉलिक प्रेस, वेल्डिंग, सोल्डरिंग, पीसीबी मिलिंग मशीन अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक स्वरूपातील मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार याठिकाणी उपलब्ध असणार आहे.

प्रश्न : विद्यार्थी, शिक्षकांना कसा उपयोग होणार आहे?

उत्तर : या लॅबसाठी देशभरातून २०४ प्रस्ताव एआयसीटीईकडे दाखल झाले होते. त्यातून मंजूर झालेल्या अंतिम ४९ प्रस्तावांमध्ये केआयटी महाविद्यालयाचा समावेश होणे हे कोल्हापूरच्या नावलौकिकामध्ये भर घालणार आहे. विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना बळ देणे हा मुख्य उद्देश या लॅबचा आहे. केवळ अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्याच नव्हे, तर अन्य विद्याशाखांमधील महाविद्यालयीन तरुणाई आणि शालेय विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रासह अन्य काही समस्या सोडविण्यासाठीच्या संकल्पना या लॅबच्या माध्यमातून मांडता येणार आहेत. या संकल्पनेवर प्रात्यक्षिक करून उपकरणे साकारता येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कौशल्य विकासाला बळ मिळणार आहे. शिक्षकांनादेखील संकल्पना मांडण्यासह त्यांच्या विषयातील संशोधन करण्यासाठी या लॅबची मदत घेता येणार आहे. विद्यार्थी, शिक्षकांच्या कौशल्य विकासासाठी विविध कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी उपक्रमांचे या लॅबच्या माध्यमातून आयोजन केले जाणार आहे.

चौकट

उद्योग क्षेत्राचे मोलाचे योगदान

केआयटी महाविद्यालयामध्ये ही आयडिया लॅब उभी करण्यामध्ये कोल्हापूरमधील उद्योगक्षेत्राचे मोलाचे योगदान आहे. कोल्हापूर, पुणे, हैदराबाद, कुवेतमधील विविध ३४ उद्योगांनी, माजी विद्यार्थ्यांनी या लॅबसाठी आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्या माध्यमातून १ कोटी २० लाख रुपयांचा निधी संकलित झाला आहे. इतकी रक्कम जमा होणारे केआयटी देशातील एकमेव महाविद्यालय आहे. या लॅबमध्ये होणारे संशोधन हे प्रामुख्याने उद्योगांबाबत असणार आहे. नवीन उत्पादन विकास, त्यामध्ये आणि सध्या असलेल्या उत्पादनांमध्ये सुधारणा करणे यांसह उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणींवर उत्तर शोधण्याचे काम या लॅॅबद्वारे होणार असल्याचे डॉ. पिसे यांनी सांगितले.

चौकट

लॅबचा पुढील टप्पा

या आयडिया लॅबमधील सुविधा आठवड्यातील सात दिवस आणि २४ तास उपलब्ध असणार आहे. या लॅबची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लॅब सुरू केली जाणार आहे. लॅबचे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले जाईल. विद्यार्थ्यांसाठी माहितीपर कार्यक्रम घेण्यात येतील. एआयसीटीईच्या नियमानुसार या लॅबमध्ये आणखी काही अद्ययावत यंत्रे, उपकरणे खरेदी केली जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १ कोटी ७५ लाख रुपये इतका खर्च प्रस्तावित असल्याचे डॉ. पिसे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना व्यासपीठ देण्यासह उद्योगक्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी या अभिनव आयडिया लॅबचा उपयोग होणार आहे. या समस्यांवर केवळ उत्तर, पर्याय शोधण्यासाठी सक्षम अभिनव मानसिकता तयार करणे असे नाही, तर हीच मानसिकता उत्पादनांच्या विकासाकडे नेण्यासह संकल्पनांची अंमलबजावणी करण्यास बळ देण्याचा केआयटीचा प्रयत्न राहणार आहे.

- डॉ. शिवलिंग पिसे

फोटो (०२०७२०२१-कोल-शिवलिंग पिसे (केआयटी)

020721\02kol_1_02072021_5.jpg

फोटो (०२०७२०२१-कोल-शिवलिंग पिसे (केआयटी)