बेल्ट, बॅट, दांडक्यांनी विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल; कोल्हापुरातील एका हॉस्टेलमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 14:29 IST2025-10-10T14:27:53+5:302025-10-10T14:29:44+5:30
हॉस्टेल प्रशासन अथवा पोलिसांकडून या संदर्भात अधिकृतरित्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही

बेल्ट, बॅट, दांडक्यांनी विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल; कोल्हापुरातील एका हॉस्टेलमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस
पेठवडगाव: अल्पवयीन मुले हातामध्ये बेल्ट, बॅट आणि दांडके घेऊन लहान विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तळसंदेमधील एका निवासी हॉस्टेलमध्ये रॅगिंगचा हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
तळसंदेमधील एका निवासी हॉस्टेलमध्ये अल्पवयीन मुले लहान विद्यार्थ्यांना रॅगिंग करुन मारहाण करत असल्याची घटना व्हायरल व्हिडिओमुळे समोर आली आहे. हातात बेल्ट, बॅट आणि दांडके घेवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणानंतर पालकांसह नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हॉस्टेल प्रशासन अथवा पोलिसांकडून या संदर्भात अधिकृतरित्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पण हे शाळेच्या हॉस्टेलमधील व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे.
रेक्टर विरोधात गुन्हा
हॉस्टेलमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या भांडणात आरोपीने दोन्ही मुलांना ताकिद दिली होती. याच भांडणाच्या कारणावरून पीटी परेडवेळी आरोपीने जखमी विद्यार्थ्यास स्टेजवर नेऊन मारहाण केली होती. यात विद्यार्थ्यास दुखापत झाली. हा प्रकार सोमवारी (दि.६) ला घडला होता. याप्रकरणी मंगळवारी (दि.७) रेक्टर विरोधात वडगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे शिक्षण क्षेत्रात नेमके काय घडते कोणाचे लक्ष आहे का? असा प्रश्न आता पालक उपस्थित करताहेत. कोल्हापुरच्या हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये काही विद्यार्थी अमानुषपणे इतर विद्यार्थ्यांना मारहाण… pic.twitter.com/9I13NGx5UQ
— Lokmat (@lokmat) October 10, 2025
समाज माध्यमावर प्रसारित होत असलेला व्हिडिओ हा जुना आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान काल काहीनी हेतुपुरस्सर हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. दरम्यान काल विद्यार्थ्यास माराहण केलेल्या रेक्टरला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. यापुढे अशी घटना घडणार नाही यांची संस्थेने दक्षता घेतली आहे. - रूपाली पाटील, अध्यक्षा