शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पुरातून पोहत जाऊन बदलला फुटलेला इन्सुलेटर

By admin | Updated: July 28, 2014 00:01 IST

‘महावितरण’च्या उचगावातील कर्मचाऱ्यांचे धाडस

वसगडे : पुराच्या पाण्यात सुमारे दोनशे फूट पोहत जाऊन उचगाव (ता. करवीर) येथील ‘महावितरण’च्या दोघा कर्मचाऱ्यांनी अकरा के.व्ही. विद्युत पोलवरील फुटलेला पिन इन्सुलेटर बदलला. अविनाश आडनाईक व रोहित पटेकर अशी या दोघा कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्या जिगरबाज कार्याचे कौतुक होत आहे. बापट कॅम्प उपकेंद्रातून उचगाव, तावडे हॉटेल, तसेच निगडेवाडी परिसरासाठी विद्युत पुरवठा केला जातो. शुक्रवारी सायंकाळी या उपकेंद्राच्या सदोष वाहिनीमुळे संपूर्ण विद्युत पुरवठा बंद झाला. उचगाव कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ताबडतोब संपूर्ण वाहिनी तपासली असता लोणार वसाहत ते तावडे हॉटेल दरम्यानच्या अकरा के. व्ही. पोलवर पावसामुळे पिन इन्सुलेटर फुटल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने व रस्त्यापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर हा पोल असल्याने रात्री पाण्यात जाणे जोखमीचे होते; मात्र महावितरणचे जिगरबाज कर्मचारी आडनाईक व पटेकर जिवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने रात्री नऊ वाजता दोनशे फूट अंतर पोहत गेले. पोलवर चढून त्यांनी खराब इन्सुलेटर बदलल्याने संपूर्ण परिसर १५ मिनिटांत प्रकाशमय झाला. उचगावचे शाखा अभियंता अशोक जगताप, हुपरीचे उपकार्यकारी अभियंता विनोद माने यांनी आडनाईक व पटेकर यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी डी. बी. मिसाळ, एम. एस. गायकवाड, आर. डी. लोहार, एस. एच. भोई उपस्थित होते. (वार्ताहर)