रायगड कॉलनीत सांडपाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST2021-09-22T04:26:22+5:302021-09-22T04:26:22+5:30

रायगड कॉलनी येथील मारुती मंदिर ते भोसले यांच्या घरापर्यंत उताराचा रस्ता आहे. त्यामुळे या गल्लीतील गटारातील सांडपाणी थेट भोसले ...

Infestation of mosquitoes due to accumulation of sewage in Raigad Colony | रायगड कॉलनीत सांडपाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव

रायगड कॉलनीत सांडपाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव

रायगड कॉलनी येथील मारुती मंदिर ते भोसले यांच्या घरापर्यंत उताराचा रस्ता आहे. त्यामुळे या गल्लीतील गटारातील सांडपाणी थेट भोसले यांच्या घराजवळ तुंबून राहते. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून, येथील नागरिकांना वारंवार आजाराचा सामना करावा लागत आहे. यासाठी अनेक वेळा गल्लीतील नागरिकांना सांगूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने यावर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

कोट :

गल्लीतील सांडपाणी आमच्या घराजवळ साचून राहिल्याने डेंग्यूसारख्या डासांची उत्पत्ती होते. यामुळे लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत अनेक जण अनेकदा आजारी पडत आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन दोन महिने उलटून गेले. मात्र, प्रशासनानेही याकडे कानाडोळा केला आहे. -चंद्रकांत भोसले, रहिवासी

Web Title: Infestation of mosquitoes due to accumulation of sewage in Raigad Colony