शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षण नसल्याने औद्योगिक अपघात

By admin | Updated: March 11, 2015 00:04 IST

एच. आर. धेंडे : सुरक्षा सप्ताहानिमित्त ‘लोकमत’मध्ये मार्गदर्शन

कोल्हापूर : मशीनवर काम करताना गप्पा मारणे, रसायने निष्काळजीपणे हाताळणे याबरोबरच पुरेसे प्रशिक्षण नसल्यामुळे औद्योगिक अपघात होतात. हे अपघात टाळायचे असतील, तर सुरक्षा साधने वापरण्याचे प्रशिक्षण कामगारांना देणे आवश्यक असल्याचे मत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक एच. आर. धेंडे यांनी मंगळवारी व्यक्त केले. ते ‘लोकमत’च्या शिरोली एमआयडीसी येथील कार्यालयात औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्त ‘औद्योगिक सुरक्षेचे महत्त्व’ या विषयावरील व्याख्यान आणि बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, व्यवस्थापक (निर्मिती) आनंद जवळकर, व्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष भोगशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, तसेच एच. आर. धेंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. धेंडे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रातील ८८ टक्के अपघात हे कामगारांच्या असुरक्षित वृत्तीमुळे, तर फक्तदहा टक्के अपघात मशीनमधील बिघाडामुळे होतात. त्यामुळे अपघात टाळण्याच्यादृष्टीने साधनांच्या हाताळणीचे कामगारांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कामगारांनी काम करताना गप्पा न मारणे, सुरक्षा साधने वापरणे, रसायन, आॅईल गळतीवेळी तज्ञांची मदत घेणे, ज्या मशीनची दुरुस्ती, साफसफाई सुरू आहे, त्यांची माहिती सर्वांना दिल्यास अपघात टाळता येणे शक्य आहे. ज्या कारखान्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही, त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे धेंडे यांनी सांगितले. संतोष भोगशेट्टी यांनी प्रास्ताविक केले. विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी सप्ताहाच्या निमित्ताने घेतलेल्या पोस्टर स्पर्धेत वृषाली शिंदे, अनिकेत ढवळे, सचिन ओतारी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. घोषवाक्य स्पर्धेत तानाजी पोरले यांनी प्रथम, तर प्रिया दंडगे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.