शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी परिसरात भारतीय स्वातंत्र्यदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:29 IST

राधानगरी : राधानगरी परिसरात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांविना ...

राधानगरी : राधानगरी परिसरात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांविना व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. बहुंताश संस्था, मंडळे यांनी निर्बंधांमुळे कार्यक्रम केले नाहीत. येथील तहसील कार्यालयातील ध्वजारोहण तहसीलदार मीना निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस निरीक्षक उदय डुबल, नायब तहसीलदार विजय जाधव, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, सभापती सोनाली पाटील यांच्यासह तालुक्‍यातील विविध खात्यांचे अधिकारी, सेवा संस्थांचे पदाधिकारी, स्वातंत्र्यसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी साईराज पांडे या विद्यार्थ्याने ‘स्वातंत्र्याचा रणसंग्राम’ या विषयावर मनोवेधक भाषण केले. येथील राधानगरी विद्यालयाचे ध्वजारोहण तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेटे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापक आर. डी. कांबळे, पर्यवेक्षिका संगीता पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत ढेरे, सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. शेटे यांचा कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल मुख्याध्यापक आर. डी. कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच कविता शेट्टी यांच्या हस्ते तर ग्रामविकास अधिकारी एम. आर. गुरव यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.