शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष समितीच्या जबाबदारीत वाढ

By admin | Updated: April 4, 2015 00:16 IST

दौलत साखर कारखाना : राजीनामे खरेखुरे की प्रतीकात्मक

नंदकुमार ढेरे -चंदगडगेले चार गळीत हंगाम बंद असलेला हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना सुरू करण्यात संचालक मंडळाला प्रयत्न करूनही यश न आल्याने त्यांनी आपले राजीनामे नुकतेच दौलत बचाव संघर्ष समितीकडे सुपूर्द केले. संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर संचालक मंडळाला राजीनामे द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर दौलत सुरू करण्याची जबाबदारी संघर्ष समितीवर असेल, तर दुसरीकडे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या व्यतिरिक्त अन्य संचालकांनी आपले राजानामे साध्या कागदावर दिले असल्याने ते खरेखुरे की प्रतीकात्मक आहेत याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.गेल्या दोन वर्षांपासून दौलत सुरू करण्याच्या दृष्टीने संघर्ष समितीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, संचालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे कारखाना चालविण्यास कोणतीच पार्टी इच्छुक नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने ठरावीक मुदतीत कारखाना सुरू करावा, अन्यथा राजीनामे देऊन बाजूला व्हावे, अशी मागणी समितीच्यावतीने लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी ‘दौलत’चे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील यांना हलकर्णी फाट्यावर अडवून राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावेळीही गोपाळराव पाटील यांनी ठरावीक मुदतीत आपण कारखाना सुरू न करू शकल्यास सर्व संचालकांचे राजीनामे दऊ, असे सांगून वेळ मारून नेली होती.त्यावेळी गोपाळराव पाटील यांनी आपला राजीनामा साध्या कागदावर लिहून दऊन वेळ मारून नेली होती. नुकतेच ‘दौलत’च्या संचालकांनी राजीनामे दिले असले तरी केवळ अध्यक्ष अशोक जाधव यांचा राजीनामा लेटरहेडवर आहे. तर अन्य संचालकांनी आपले राजीनामे साध्या कागदावर दिले आहेत. ‘दौलत’ची नोंदणी बहुराज्य कायद्याखाली असल्याने साध्या कागदावरील राजीनामे केंद्रीय सहकार निबंधक ते ग्राह्य मानणार का ? संचालकांनी दिलेले राजीनामे हे ऐनवेळी दिलेले नाहीत. त्यामुळे राजीनामे देताना संचालकांजवळ लेटरहेड नव्हते, असे म्हणण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामे साध्या कागदावर देण्यामागील हेतू काय? काही असले तरी ज्या पोटतिडकीने संघर्ष समितीने संचालकांचे राजीनामे घेतले. त्याच पोटतिडकीने आता संघर्ष समितीला ठोस पावले उचवावी लागतील.जिल्हा बँकेची भूमिका महत्त्वाची थिटे पेपर्सचा दावा न्यायालयाने फेटाळल्याने एक अडथळा दूर झाला आहे. मात्र, आता बँक कारखान्याची निर्विवाद ताबेदार झाल्याने ‘दौलत’चे काय करायचे याचा निर्णय बँकच घेणार आहे. दौलत सुरू करण्यासंदर्भात बँक, सभासद, शेतकरी व कामगार यांची संयुक्त बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे दौलत बचाव संघर्ष समितीचे नेते डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले.दौलत कारखाना सुरू करण्यासंदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. त्याचबरोबर कारखाना चालवायला देण्यासंदर्भात येत्या चार दिवसांत वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध केली जाणार असून, कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू व्हावा हीच आमचीही इच्छा असल्याचे जिल्हा बँकेचे प्रशासक प्रताप चव्हाण यांनी सांगितले.