शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

वाढत्या हिंसाचारामुळे वाढती वैफल्यग्रस्तता : मानसोपचार तज्ज्ञांचे विश्लेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:28 IST

विश्वास पाटील ।कोल्हापूर : व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील वाढती वैफल्यग्रस्तता हेच समाजातील हिंसाचार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या गतीने हा हिंसाचार वाढत आहे तो समाजाला कुठे नेऊन ठेवणार आहे हे परमेश्वरालाच ठाऊक, अशीही भीती सोमवारी तज्ज्ञांतून व्यक्त झाली.धुळे जिल्ह्यांत मुले पळवून किडनी काढणारी टोळी आल्याच्या संशयातून ...

ठळक मुद्देधुळे जिल्ह्यातील घटनेमागील कारणांचा शोध

विश्वास पाटील ।कोल्हापूर : व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील वाढती वैफल्यग्रस्तता हेच समाजातील हिंसाचार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या गतीने हा हिंसाचार वाढत आहे तो समाजाला कुठे नेऊन ठेवणार आहे हे परमेश्वरालाच ठाऊक, अशीही भीती सोमवारी तज्ज्ञांतून व्यक्त झाली.

धुळे जिल्ह्यांत मुले पळवून किडनी काढणारी टोळी आल्याच्या संशयातून सोलापूर जिल्ह्यातील पाचजणांना समूहाने अत्यंत क्रूरपणे ठेचून मारले. कुण्याही संवेदनशील माणसाच्या अंंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. एवढ्या मोठ्या समूहामध्ये ते लोक कोण आहेत, याची कोणतीच चौकशी करावी किंवा त्यांना पोलीस येईपर्यंत हातपाय बांधून खोलीत डांबून ठेवावे व त्यानंतर त्यांचा न्याय करावा असे का वाटले नसेल, असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात दाटले. एक समाज म्हणून आपण नक्की कोणत्या दिशेने निघालो आहोत याबद्दलही मनात भीतीचे काहूर उमटले.

गेल्या सहा महिन्यांपूर्वीच ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील हे एका मुलाखतीत म्हटले होते, की मला आज अशी भीती वाटते की येणाऱ्या काळात लोक दिवसाढवळ्या लोकांचे खून पाडतील एवढी अस्वस्थता समाजात साचली आहे. त्यांची भीती सत्यात उतरायला फार वेळ लागलेला नाही. लोक कोणत्याही क्षुल्लक कारणांवरून दिवसाढवळ्या लोकांचे मुडदे पाडू लागले आहेत.

याच घटनेच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पी. एम. चौगले यांच्याशी संवाद साधला व सामूहिक हिंसेच्या घटनेमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला.डॉ. चौगले म्हणाले, ‘समाजात बेरोजगारी, दारिद्र्य, कौटुंबिक अस्वस्थता यावरून लोकांच्या मनांत ताण आहे. मग हा ताण किंवा चीड अशा सामूहिक घटनांतून व्यक्त होत आहे का अशी शंका वाटावी, अशी स्थिती आहे. अशा हिंसाचारामध्ये सहभागी होणारा माणूस त्या घटनेबाबत फारसा गंभीर नाही. आपल्या पुढचा माणूस दगड मारत आहे किंवा लाथ मारत आहे म्हटल्यावर तोदेखील पुढे होऊन त्यामध्ये सहभागी होत आहे. बºयाचदा मारणाºयाला हे माहीत नसते की, आपण कुणाला कशासाठी मारत आहोत. कारण समूह मानसिकतेमध्ये सारासार विवेक हरवून जातो.’

सामाजिक हिंसाचारच वाढला असे नसून आपल्या घरातील हिंसाचारही वाढला आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लोक आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. त्यांच्यातील सहनशीलता, समजूतदारपणा किंवा संयम कमी झाला आहे असे सांगून डॉ. चौगले म्हणाले, ‘मग अशा घटनांतून निर्माण होणारा राग व्यक्त करण्यासाठी एखादे असे सामाजिक हिंसेचे आऊटलेट मिळाले की समाज बेभान होत आहे. पूर्वी समाजाला चार-दोन गोष्टींबद्दल तरी किमान आदर असायचा. आता तो कमी झाला आहे. डॉक्टरांवरील अलीकडील काळात वाढलेले हल्ले हे त्याचेच द्योतक आहे.

हा समाज जसा डॉक्टरांवर अविश्वास दाखवीत आहे तसाच तो राजकीय व्यवस्थेबद्दलही, पोलीस यंत्रणेबद्दलही दाखवीत आहे. प्रत्येक पेशामध्ये जसे वाईट आहे, तसे थोडे कमी असले तरी चांगलेही आहे. यावरील समाजाचा विश्वास उडत चालला आहे हा माझ्या मते आजच्या आणि उद्याच्या समाजासमोरीलही मोठा धोका व चिंतेची बाब आहे.’ही आहेत महत्त्वाची कारणेधुळ््यात मुले पळवणारी टोळी असल्याचा संशयातून सोलापूर जिल्ह्यातील पाचजणांना मारताना समाजाची संवेदनशीलता हरवलीसहनशीलता, समजूतदारपणा, संयम कमी झाल्याने छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लोक आत्महत्या करत आहेत.सामूहिक हिंसाचारामध्ये सहभागी होणारा माणूस त्या घटनेबाबत फारसा गंभीर नाही.समूह मानसिकतेमध्ये सारासार विवेक हरवून जातो.बेरोजगारी, दारिद्र्य, कौटुंबिक अस्वस्थता यावरून लोकांच्या मनात ताण आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा