शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे माजी आमदार क्षीरसागर यांच्या सुरक्षेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाने रविवारी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सुरक्षेबाबत मोठे निर्णय घेतले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्य शासनाने रविवारी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सुरक्षेबाबत मोठे निर्णय घेतले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सुरक्षा काढून घेतली, तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना नियोजन मंडळाचे पूर्ण अधिकार देत असतानाच त्यांच्या सुरक्षेत वाढ करून ‘एक्स’ सुरक्षा दिली आहे. पाटील यांना एस्कॉर्टसह वायरलेस सुरक्षा होती.

भाजप-शिवसेना युती शासनाच्या काळात ज्या ज्या वेळी मंत्री मंडळ विस्ताराची चर्चा व्हायची त्यावेळी राजेश क्षीरसागर यांचे नाव आघाडीवर राहायचे. जून २०१९ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र, ऐन वेळी नाट्यमय घडामोडी होऊन त्यांचे नाव मागे पडले. मंत्री पदाने हुलकावणी दिली असली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट दर्जाचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देत निष्ठावंत शिवसैनिकाचा सन्मान केला. मात्र, ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेश क्षीरसागर यांचा पराभव झाला. त्यानंतर अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचे शासन सत्तेवर आले. महामंडळाच्या वाटपात अनेक मंडळे बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नियोजन मंडळाची जबाबदारी क्षीरसागर यांच्याकडे कायम ठेवली. कोरोनामुळे आठ-नऊ महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्य सचिव संजीवकुमार, मुख्य सल्लागार अजोय मेहता आदींना बोलावून क्षीरसागर यांना नियोजन मंडळाचे अधिकार सोपविण्याची सूचना केली. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील विकास कामांसाठी पाच कोटींच्या निधीला मंजुरीही दिली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांना ताकद मिळाली आहेे.