शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय कचऱ्याच्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णांची संख्या वाढली तशी वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. शहरात रोज सरासरी आठशे किलो ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णांची संख्या वाढली तशी वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. शहरात रोज सरासरी आठशे किलो वैद्यकीय कचरा निर्माण होत होता. त्याचे प्रमाण कोरोना संसर्गाच्या काळात प्रतिदिन चारशे किलोने वाढले आहे. हा सर्व कचरा इतरत्र रस्त्यावर पडणार नाही याची खबरदारी महानगरपालिका प्रशासनातर्फे घेतली असून, शास्त्रीय पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जात आहे.

वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत एक प्रकल्प लाईन बाजार परिसरात उभारला असून, त्याची क्षमता सोळाशे किलोची आहे. वैद्यकीय कचरा नोंदणीकृत रुग्णालयातून गोळा केला जातो. जर कोणी तो उघड्यावर टाकल्याचे आढळून आल्यास, त्यांच्यावर पाच हजार रुपयांचा दंड केला जातो. त्यामुळे सहसा कोणी उघड्यावर टाकण्याचे धाडस करत नाहीत. सध्या कोरोना संसर्गाचा काळ असल्यामुळे वैद्यकीय कचऱ्याकडे आरोग्य विभाग फारच गांभीर्याने पाहत आहे.

- पॉईंटर्स

-शहरात रोज निघणारा कचरा - २०० ते २२० टन

-ओला कचरा - १८० ते १९० टन

-सुका कचरा - २० ते ३० टन

-रुग्णालयांमधून निर्माण होणारा कचरा - प्रतिदिन १२०० किलो

-वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट-

रुग्णालयातून प्रतिदिन ८०० किलो वैद्यकीय कचरा निर्माण होतो म्हणून महानगरपालिका प्रशासनाने लाईन बाजार परिसरात १६०० किलो कचरा नष्ट करणारा प्रकल्प उभा केला आहे. हा सर्व कचरा रुग्णालयातून विशेष गाडीतून गोळा केला जातो. नंतर तो शास्त्रीय पद्धतीने जाळून टाकला जातो. गतवर्षी जून महिन्यात कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक सुरू होता, त्यावेळी रोज चार हजार किलो वैद्यकीय कचरा गोळा होत होता. त्यामुळे तो नष्ट करण्याकरिता मुंबईला पाठविला जात होता. सध्या कोल्हापूर शहरात कोरोनाची साथ पुन्हा सुरू झाल्यामुळे १२०० किलोपर्यंत रोज कचरा डेपोत गोळा होत आहे.

- रोजच्या कचऱ्यातील मास्कचे प्रमाण अत्यल्प-

रोजच्या कचऱ्यात दोन प्रकारचे मास्क येतात. त्यामध्ये घरगुती वापर आणि सर्जिकल वापर मास्कचा समावेश असतो. रोजच्या कचऱ्यातून केवळ रुग्णालयात वापरलेले सर्जिकल मास्क येतात. त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. घरगुती मास्क वारंवार स्वच्छ धुऊन वापरले जातात, त्यामुळे कचऱ्यातील त्याचे प्रमाण अगदीच अत्यल्प आहे. तरीही जे येतात, त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते.

- पालिका अधिकाऱ्याचा कोट -

रुग्णालयातून येणाऱ्या सर्जिकल मास्कसह अन्य वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. जर प्रकल्पाचा क्षमतेपेक्षा जादा कचरा यायला लागला तर तो मुंबईकडे पाठविण्यात येतो.

डॉ. विजय पाटील, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख