शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीवरील व्याजावर बसणार आयकर

By admin | Updated: March 9, 2015 23:56 IST

आयकर विभागाकडून आदेश : नागरी सहकारी बँकांना दहा हजारांवरील व्याजावर आयकर; जिल्ह्यात आठ हजार कोटींवर ठेवी

प्रकाश पाटील - कोपार्डे -आयकर विभागाने सर्वच नागरी बँकांत असणाऱ्या ठेवी व ज्यावर दहा हजारांच्या वर व्याज घेणाऱ्या सभासद ठेवीदारांना ते प्राप्तिकरासाठी पात्र ठरविण्याचा निर्णय घेतला असून, येत्या १ जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, असे स्पष्ट आदेश आयकर विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरी सहकारी बँकांच्या व्यवस्थापनामध्ये खळबळ उडाली आहे. याचा परिणाम नागरी बँकांच्या व्यवहारावर होणार आहे.इतर राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असणाऱ्या ठेवीदारांच्या ठेवीवर वार्षिक दहा हजारपेक्षा जास्त होणाऱ्या व्याजावर उद्गम कर (प्राप्तिकर) घेण्याची तरतूद आहे. मात्र, यातून आघाडी शासनाने नागरी सहकारी बँकांना वगळण्यात आले होते. सहकारी बँकांच्या सभासद ठेवीदारांना प्राप्तिकरातून सूट देताना यात व्याजावर कोणताही प्राप्तिकर लावण्यात येत नव्हता. याचा परिणाम नागरी बँकांमध्ये ठेवीदारांचा ओढा वाढला होता. यामध्ये उद्योगपती व व्यापाऱ्यांपेक्षा शेतकरी व कृषी संलग्न असणाऱ्या लोकांची मोठी संख्या आहे.मात्र, आयकर भवनमध्ये सर्वच नागरी सहकारी बँकांची बैठक बोलावून २६ फेब्रुवारीला या बँकामध्ये ज्या सभासदांच्या ठेवी आहेत. त्या ठेवीवरील व्याज १० हजारांपेक्षा जास्त असेल, तर ते प्राप्तिकरास पात्र असल्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी १ जून २०१५ पासून करण्याचेही आदेश दिल्याने नागरी सहकारी बँकांना दिल्याने बँकांच्या प्रशासनामध्ये व ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरी सहकारी बँकांमध्ये असणारे ठेवीदार आपल्या ठेवी एक लाखाच्या वरती ठेवणार नाहीत. त्याचबरोबर ज्यांच्या सध्या अशा ठेवी आहेत, ते काढून घेतील. यामुळे बँकांच्या खेळत्या भांडवलावर त्याचा परिणाम होऊन बँका आर्थिक अडचणीत सापडणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.रिझर्व्ह बँकेने सर्वच बँकांना कोअर बँकिंग करण्याचे बंधन घातले आहे. यामुळे ‘कस्टमर आय डी’ होणार असून, त्याचे ‘मॅपिंग’ होणार आहे. यामुळे जरी ठेवीदारांनी अथवा सभासदांनी आपल्या ठेवी एकाच नागरी सहकारी बँकेच्या वेगवेगळ्या शाखेत ठेवल्या तरी ते सर्व व्यवहार एका ‘कस्टमर आयडी नंबर’वर येणार असल्याने सर्व व्यवहाराचे एकत्रीकरण करून त्यातून किती व्याज मिळाले, किती व्यवहार झाले हे स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात असणाऱ्या नागरी सहकारी बँकांची संख्या व आर्थिक स्थिती चांगली आहे. ४५ नागरी बँकांचा विचार केल्यास आठ हजार कोटींवर ठेवी या बँकांमध्ये आहेत. यामुळे बँकांना चांगले खेळते भांडवल उपलब्ध आहे; पण दहा हजारांच्या रकमेला दहा टक्के प्राप्तिकर लागणार असल्याने पुन्हा ठेवीदारांचा कल या ठेवी काढण्याकडे राहून स्थावर व जंगम मालमत्तेत गुंतवणुकीवर भर राहणार असून, यामुळे यांच्या किमती भरमसाट वाढणार आहेत.आर्थिक स्थिती बिघडणारनागरी बँकांमध्ये असणाऱ्या ठेवीवर दहा हजारांपेक्षा जास्त व्याज झाले, तर प्राप्तिकराला प्राप्त ठरविल्याने ठेवी काढून घेऊन ते स्थावर व जंगम मालमत्तेत गुंतविण्याकडे लोकांचा कल वाढणार आहे. मात्र, यामुळे बँकांकडील खेळत्या भांडवलाला मोठी घट होऊन सहकारी बँकांमधील आर्थिक स्थिती बिघडणार आहे. हा निर्णय आयकर विभागाने मागे घेऊन सहकारी बँकांना दिलासा द्यावा.