विश्वास पतसंस्थेच्या कुडित्रे शाखेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST2021-09-23T04:27:12+5:302021-09-23T04:27:12+5:30

करंजफेण : कोतोली (ता. पन्हाळा) येथील विश्वास सहकारी पतसंस्थेची दुसरी शाखा कुडित्रे येथील सरस्वती संकुलमध्ये सुरू करण्यात आली. शाखेचे ...

Inauguration of Kuditre branch of Vishwas Patsanstha | विश्वास पतसंस्थेच्या कुडित्रे शाखेचे उद्घाटन

विश्वास पतसंस्थेच्या कुडित्रे शाखेचे उद्घाटन

करंजफेण : कोतोली (ता. पन्हाळा) येथील विश्वास सहकारी पतसंस्थेची दुसरी शाखा कुडित्रे येथील सरस्वती संकुलमध्ये सुरू करण्यात आली. शाखेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पन्हाळा तालुक्यातील लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी संस्थेचे संस्थापक विश्वास पाटील यांनी पतसंस्थेची स्थापना केली होती. जिद्द, चिकाटी, पारदर्शी कारभाराच्या बळावर संस्थेकडे अल्पावधित नऊ कोटी १७ लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत.

यावेळी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे भागभांडवल व निधी १ कोटी ३६ लाख असून, कर्ज ६ कोटी २१ लाख, गुंतवणूक ४ कोटी ४६ लाख, खेळते भांडवल ११ कोटी, नफा २२ लाख, तर संस्थेची वार्षिक उलाढाल ३८ कोटी १९ लाख इतकी आहे. यावेळी संस्थापक विश्वास पाटील, उपाध्यक्ष यशवंत पाटील, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक एन.डी. चौगुले, हनुमान उद्योग समूहाचे अध्यक्ष बळवंत पाटील, विनोद कोपार्डेकर, पी.एम. पाटील, प्रधान पाटील, प्रसाद पाटील, युवराज बेलेकर, सज्जन पाटील, विकास भिके, गजानन पाटील, महादेव चौगले, रामदास चोपडे, तसेच संचालक व सभासद उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Kuditre branch of Vishwas Patsanstha