शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य खत विक्री, कोल्हापूर जिल्ह्यात १२ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:05 IST

कृषी विभागाचा दणका : अनुदानित खतांची विक्री फक्त ई-पॉस प्रणालीद्वारेच करा

कोल्हापूर : कृषी विभागाच्या तपासणीदरम्यान नियम भंग केल्याचे आढळल्याने जिल्ह्यातील १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागाने निलंबित केले. त्यामध्ये एकट्या दानोळी (ता.शिरोळ) येथील तीन केंद्रांचा समावेश आहे.कृषी विभागाने जिल्ह्यात अलीकडेच राबवलेल्या तपासणी मोहिमेत काही कृषी सेवा केंद्रांकडून नियमबाह्यपणे ऑफलाईन पद्धतीने खतांची विक्री झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ई-पॉस प्रणालीतील नोंदी व प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळून आल्याने अशा सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली.जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांनी शेतकऱ्यांना अनुदानित खतांची विक्री करताना डिजिटल विक्री यंत्र (ई-पॉस प्रणाली) द्वारेच विक्री करणे बंधनकारक असून, याबाबत केंद्र सरकारच्या स्पष्ट सूचना आहेत. शेतकऱ्यांनी देखील अनुदानित खते खरेदी करताना केवळ ई-पॉस यंत्रामार्फतच खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माने यांनी केले आहे.अनुदानित खत युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश, डोएपी, १०-२६-२६ आदी खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारेच वैध आहे. किरकोळ खत विक्रेत्यांनी साठा ई-पॉस प्रणालीवर उपलब्ध झाल्यानंतरच खतांची विक्री सुरू करावी. अनुदानित खतांची विक्री ई-पॉसशिवाय करणे ही गंभीर बाब आहे. ऑफलाइन पद्धतीने विक्री केल्यामुळे कृषी सेवा केंद्रातील ई-पॉस प्रणाली व प्रत्यक्ष खतसाठ्यात तफावत आढळून येत आहे. भरारी पथकाद्वारे विविध कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली.

परवाने निलंबित झालेली कृषी केंद्रे

  • जंगम कृषी उद्योग,शाहूपुरी - कोल्हापूर.
  • रेणुका ट्रेडर्स, शाहूपुरी, कोल्हापूर
  • कृषीधन ॲग्रो सर्व्हिस, दानोळी
  • पद्मावती कृषी सेवा केंद्र, दानोळी
  • बसवेश्वर फर्टिलायझर, दानोळी
  • ओंकार कृषी सेवा केंद्र, लाटवडे.
  • गुरुकृपा ट्रेडर्स, साळवण-गगनबावडा
  • माऊली कृषी सेवा केंद्र, किणे-आजरा.
  • मनाली कृषी सेवा केंद्र, कूर- भुदरगड.
  • राज फर्टिलायझर आणि केमिकल्स, जयसिंगपूर.
  • शिवतेज कृषी सेवा केंद्र, गिरगाव- करवीर
  • शेतकरी शेती विकास केंद्र, बाजारभोगाव