शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर कनेक्शन, जलअभियंता भोसले यांना घेराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 19:32 IST

muncipalty carportation water kolhapur- महाद्वार व ताराबाई रोड परिसरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना कपिलतीर्थातील स्वच्छतागृहास बेकायदेशीर नळजोडणी दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी जल अभियंता नारायण भोसले यांना सुमारे एक तास घेराव घालून त्यांना धारेवर धरले.

ठळक मुद्देबेकायदेशीर कनेक्शन, जलअभियंता भोसले यांना घेराव  ताराबाई रोड परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर

कोल्हापूर : महाद्वार व ताराबाई रोड परिसरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना कपिलतीर्थातील स्वच्छतागृहास बेकायदेशीर नळजोडणी दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी जल अभियंता नारायण भोसले यांना सुमारे एक तास घेराव घालून त्यांना धारेवर धरले.

शहरातील कपिलतीर्थ, वांगी बोळ, दातार बोळ, तोफखाने बोळ, पोतनीस बोळ, गुरुमहाराज वाडा परिसरात सातत्याने कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्नाची निर्गत झाली नाही. अशातच बुधवारी रात्री बेकायदेशीरपणे कपिलतीर्थातील स्वच्छतागृहात नळ कनेक्शन देण्यात आले. त्याची माहिती होताच माजी नगरसेवक अजित ठाणेकर, भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये, अशोक देसाई यांच्या नेतृत्वाखाली नागरिक कपिलतीर्थात जमा झाले. जल अभियंता नारायण भोसले यांना बोलावण्यात आले.जल अभियंता आल्यानंतर नागरिक व महिलांनी त्यांना घेराव घालून यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. ज्या कर्मचाऱ्यांने नळजोडणीला परवानगी दिली त्याला निलंबित करून चौकशी करावी, अशी मागणी अजित ठाणेकर यांनी केली. हेमंत आराध्ये यांनी, जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असे ठणकावून सांगितले. पुरेसे पाणी द्या मग इथून जा, असे महिलांनी नारायण भोसले यांना सुनावले.नागरिकांच्या रोषामुळे जल अभियंत्यांनी कामगार बोलून बेकायदेशीरपणे जोडण्यात आलेले कनेक्शन तोडून टाकले. तसेच दिलेल्या जोडणीच्या बाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी भाजपा शिवाजी पेठ मंडल अध्यक्ष प्रदीप पंडे, नीलम जाधव, अनुराधा गोसावी, दीपा ठाणेकर, दीपाली शेटे, मंगल गुरव, ऊर्मिला ठाणेकर, अनिश पोतदार, संतोष जोशी, संतोष कदम, सतीश नानेगावकर, सागर जाधव, मैंदरगीकर उपस्थित होते. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरWaterपाणी