Kolhapur: नांदायला बायको परत पाहिजे असेल, तर तीन लाख दे; नातेवाइकांकडून अजब मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:44 IST2025-06-16T16:44:03+5:302025-06-16T16:44:15+5:30

आठ जणांवर गुन्हा दाखल

If you want your wife back give her three lakhs Demand from relatives in kolhapur | Kolhapur: नांदायला बायको परत पाहिजे असेल, तर तीन लाख दे; नातेवाइकांकडून अजब मागणी

Kolhapur: नांदायला बायको परत पाहिजे असेल, तर तीन लाख दे; नातेवाइकांकडून अजब मागणी

कोल्हापूर : लग्नानंतर सुरू झालेल्या कौटुंबिक वादातून विभक्त राहत असलेल्या बायकोने परत नांदायला येण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केली, तसेच पावणेपाच लाखांच्या रोकडसह एक तोळे दागिने आणि तीन मोबाइल घेऊन निघून गेल्याची फिर्याद लखन अण्णासो बेनाडे (वय ३१, रा. रांगोळी, ता. हातकणंगले) याने शनिवारी (दि.१४) शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी पत्नीसह आठ जणांवर गुन्हा दाखल केला.

फिर्यादी लखन आणि लक्ष्मी यांचे ऑक्टोबर २०२४ मध्ये लग्न झाले. त्यानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये कौटुंबिक वादातून खटके उडू लागले. यातून पत्नीसह तिच्या नातेवाइकांनी वेळोवेळी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दाभोलकर कॉर्नर येथे पावणेपाच लाखांची रोकड घेतली. 

लग्नात घातलेले एक तोळ्याचे दागिने आणि घरातील तीन मोबाइल घेऊन पत्नी लक्ष्मी निघून गेली. तिला परत आणायला गेल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी मारहाण केली, तसेच तिला पुन्हा घेऊन जायचे असेल, तर तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. या त्रासाला कंटाळून अखेर त्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: If you want your wife back give her three lakhs Demand from relatives in kolhapur