Shaktipeeth Highway: शक्तिपीठास विरोध न केल्यास कोल्हापूर जिल्हा महापुरात - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:30 IST2026-02-17T12:28:50+5:302026-02-17T12:30:00+5:30
पुढच्या काळात शक्तिपीठ व वीज दरवाढीविरोधात मोठे आंदोलन उभे करावे लागेल

Shaktipeeth Highway: शक्तिपीठास विरोध न केल्यास कोल्हापूर जिल्हा महापुरात - राजू शेट्टी
कोल्हापूर : आम्ही विरोध केला म्हणून सरकारने शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग जोतिबा, भोगावती या मार्गे काढला असला तरी हा मार्ग पूर्ण जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा आहे. त्यामुळे राधानगरीकरांसह सर्वांनीच या नव्या मार्गाला कडाडून विरोध करावा, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी केले.
शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गमुळे पूर परिस्थिती उद्भवणार आहे. सत्ताधाऱ्यांना यामध्ये भ्रष्टाचार करून निवडणुकीत तो पैसा वापरायचा आहे. याचे सर्व ठेकेदार भाजपचे आमदार आहेत. महापुराच्या खाईत लोटणारा हा नवा मार्ग असून त्याला सर्वांनीच विरोध करावा. मी आणि सतेज पाटील २०२९ पर्यंत हा महामार्ग होऊ देत नाही, असा निर्धारही शेट्टी यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनीही आम्ही विकासाच्या विरोधात नाही मात्र, चुकीच्या विकासाला आमचा विरोध राहील, असे सांगितले. पुढच्या काळात शक्तिपीठ व वीज दरवाढीविरोधात मोठे आंदोलन उभे करावे लागेल, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.