शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
Top Marathi News Live: इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ
3
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
4
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
5
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
6
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
7
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
8
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
9
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
10
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
11
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
12
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
13
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
14
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
15
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
16
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
17
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
18
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
19
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
20
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील संपाने ४0 दिवसांचा विक्रम मोडला

By admin | Updated: September 1, 2015 20:51 IST

४३ वा दिवस : न्यायालयात तारीख पे तारीख : शहरात चिंतेचे वातावरण

अतुल आंबी- इचलकरंर्जी -सुधारित किमान वेतनप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीकडे शहरातील वस्त्रोद्योगासह अन्य लहान-मोठ्या सर्वच उद्योजक व नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. पुढील तारीख पडल्याने सर्वांच्या पदरी निराशाच पडली आहे. संपाचा आज ४३ वा दिवस असून, मागील संपाचे ४० दिवसांचे रेकॉर्ड यावेळी मोडण्यात आले आहे. तरीही याप्रश्नी तोडगा निघत नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. वस्त्रोद्योगासाठी हे वातावरण घातक असल्याचे बोलले जात आहे.दोन वर्षांपूर्वी यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीच्या मागणीसाठी यंत्रमाग कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने संप पुकारण्यात आला होता. यंत्रमाग कामगारांसाठी काम करणाऱ्या विविध दहा संघटनांचा यामध्ये समावेश होता. त्यावेळी मजुरीवाढीची कोंडी फुटत नसल्याने ४० दिवस संप ताणला गेला. या संपामुळे शहरातील वस्त्रोद्योगाला मोठा फटका बसला. मुंबईसह देश-विदेशांतील कापड मार्केटवर याचा परिणाम झाला. इचलकरंजीला एखादी मोठी आॅर्डर द्यायचे म्हटले, तर वेळेत काम पूर्ण करून मिळण्याची शाश्वती नसल्याने बाहेरचे व्यापारी दचकत होते. हा डाग पुसट होत आला असतानाच यावर्षी पुन्हा मंदीच्या वातावरणातच संप झाला. त्यामुळे इचलकरंजीचे नाव मार्केटमध्ये पुन्हा खराब होऊ लागले.वारंवार विविध घटकांच्या संपामुळे, तसेच याबाबत वेळीच चर्चा करून तोडगा न काढण्याची भूमिका घेणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींमुळे आता वस्त्रोद्योग वेगवेगळ्या संकटात अडकत जात आहे. वस्त्रोद्योगाला लागलेली ही कीड वेळीच रोखली नाही, तर वस्त्रोद्योग पोखरून निघणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्यासह सर्वच घटकांंनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे बनले आहे. चौकटवस्त्रोद्योगामुळे मोठी प्रगती१९०४ पासून येथील वस्त्रोद्योगाने अनेकवेळा चढ-उतार व तेजी-मंदीचा सामना केला आहे. त्यातूनही तग धरून शंभर वर्षांत येथील वस्त्रोद्योगात लक्षणीय वाढ झाली आहे. हातमागापासून ते सेमी आॅटो, आॅटोलूमपर्यंत शहराची प्रगती झाली आहे. त्याचबरोबर सायझिंग, प्रोसेसर्स, सूतगिरणी यासह वस्त्रोद्योगाशी निगडित अन्य व्यवसायातही त्या तुलनेत मोठी प्रगती झाली आहे.मार्ग काढण्याची गरजकिमान वेतनप्रश्नी सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यावर अवलंबून न राहता कायदा व व्यवहार याची सांगड घालून यातून मार्ग काढावा लागणार आहे. त्यामुळे दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भूमिका तपासून चर्चेतून मार्ग काढणे गरजेचे आहे.