शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील संपाने ४0 दिवसांचा विक्रम मोडला

By admin | Updated: September 1, 2015 23:26 IST

४३ वा दिवस : न्यायालयात तारीख पे तारीख : शहरात चिंतेचे वातावरण

अतुल आंबी- इचलकरंर्जी  सुधारित किमान वेतनप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीकडे शहरातील वस्त्रोद्योगासह अन्य लहान-मोठ्या सर्वच उद्योजक व नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. पुढील तारीख पडल्याने सर्वांच्या पदरी निराशाच पडली आहे. संपाचा आज ४३ वा दिवस असून, मागील संपाचे ४० दिवसांचे रेकॉर्ड यावेळी मोडण्यात आले आहे. तरीही याप्रश्नी तोडगा निघत नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. वस्त्रोद्योगासाठी हे वातावरण घातक असल्याचे बोलले जात आहे.दोन वर्षांपूर्वी यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीच्या मागणीसाठी यंत्रमाग कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने संप पुकारण्यात आला होता. यंत्रमाग कामगारांसाठी काम करणाऱ्या विविध दहा संघटनांचा यामध्ये समावेश होता. त्यावेळी मजुरीवाढीची कोंडी फुटत नसल्याने ४० दिवस संप ताणला गेला. या संपामुळे शहरातील वस्त्रोद्योगाला मोठा फटका बसला. मुंबईसह देश-विदेशांतील कापड मार्केटवर याचा परिणाम झाला. इचलकरंजीला एखादी मोठी आॅर्डर द्यायचे म्हटले, तर वेळेत काम पूर्ण करून मिळण्याची शाश्वती नसल्याने बाहेरचे व्यापारी दचकत होते. हा डाग पुसट होत आला असतानाच यावर्षी पुन्हा मंदीच्या वातावरणातच संप झाला. त्यामुळे इचलकरंजीचे नाव मार्केटमध्ये पुन्हा खराब होऊ लागले.वारंवार विविध घटकांच्या संपामुळे, तसेच याबाबत वेळीच चर्चा करून तोडगा न काढण्याची भूमिका घेणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींमुळे आता वस्त्रोद्योग वेगवेगळ्या संकटात अडकत जात आहे. वस्त्रोद्योगाला लागलेली ही कीड वेळीच रोखली नाही, तर वस्त्रोद्योग पोखरून निघणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्यासह सर्वच घटकांंनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे बनले आहे. चौकट... वस्त्रोद्योगामुळे मोठी प्रगती१९०४ पासून येथील वस्त्रोद्योगाने अनेकवेळा चढ-उतार व तेजी-मंदीचा सामना केला आहे. त्यातूनही तग धरून शंभर वर्षांत येथील वस्त्रोद्योगात लक्षणीय वाढ झाली आहे. हातमागापासून ते सेमी आॅटो, आॅटोलूमपर्यंत शहराची प्रगती झाली आहे. त्याचबरोबर सायझिंग, प्रोसेसर्स, सूतगिरणी यासह वस्त्रोद्योगाशी निगडित अन्य व्यवसायातही त्या तुलनेत मोठी प्रगती झाली आहे.मार्ग काढण्याची गरजकिमान वेतनप्रश्नी सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यावर अवलंबून न राहता कायदा व व्यवहार याची सांगड घालून यातून मार्ग काढावा लागणार आहे. त्यामुळे दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भूमिका तपासून चर्चेतून मार्ग काढणे गरजेचे आहे.