शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
3
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
4
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
5
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
6
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
7
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
8
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
9
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
10
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
11
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
12
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
14
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
15
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
16
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
17
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
18
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
19
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
20
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
Daily Top 2Weekly Top 5

माझी वसुंधरा अभियानात इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:41 IST

यामध्ये राज्यातील ४२२ नागरी स्थानिक संस्था आणि २७ हजार ८९५ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता

कोल्हापूर : शासनाच्या पर्यावरण विभागाने माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि अधिकारी यांचे क्रमांक मंगळवारी जाहीर केले. यामध्ये तीन लाख लोकसंख्या गटात राज्यस्तरावर इचलकरंजी महानगरपालिकेने दुसरा क्रमांक मिळवला. पंचवीस हजार ते ४० हजार लोकसंख्या गटात राज्यस्तरावर कागल नगरपरिषद दुसरा आणि गडहिंग्लज नगरपरिषद तिसरा क्रमांक मिळवला. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकारी गटात कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा दुसरा क्रमांक आला आहे. पुणे विभाग स्तरावर सर्वाेत्तम कामगिरीत कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांची निवड झाली आहे.

जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे म्हणून करवीरचे तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांची निवड झाली आहे. एक जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ अखेर पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वावर आधारित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान ५.० राबवण्यात आले. यामध्ये राज्यातील ४२२ नागरी स्थानिक संस्था आणि २७ हजार ८९५ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडलेल्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील निधी देण्यात येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji, Kagal, Gadhinglaj Shine in Majhi Vasundhara Abhiyan

Web Summary : Ichalkaranji, Kagal, and Gadhinglaj excelled in the Majhi Vasundhara Abhiyan 5.0. Kolhapur's Collector Amol Yedge and Zilla Parishad CEO S. Karthikeyan were also recognized for their outstanding performance. The campaign, focused on environmental elements, involved numerous local bodies, and top performers will receive funding from the Maharashtra Pollution Control Board.