इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:41+5:302021-02-05T06:53:41+5:30
इचलकरंजी : येथील आपटे वाचन मंदिरच्यावतीने इयत्ता तिसरी व चौथीमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी कथाकथन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ही स्पर्धा १४ ...

इचलकरंजी संक्षिप्त बातम्या
इचलकरंजी : येथील आपटे वाचन मंदिरच्यावतीने इयत्ता तिसरी व चौथीमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी कथाकथन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ही स्पर्धा १४ फेब्रुवारीला होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपली नावे मुख्याध्यापकांच्या शिफारशीसह ११ फेब्रुवारीपर्यंत ग्रंथालयाकडे पाठवून द्यावीत. ही स्पर्धा इचलकरंजी शहरापुरती मर्यादित आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नंदिनी कांबळे हिची निवड
(फोटो)
२८०१२०२१-आयसीएच-०२ (नंदिनी कांबळे)
इचलकरंजी : दि न्यू हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी नंदिनी शशिकांत कांबळे हिची पॅरामिलिटरी फोर्सअंतर्गत इंडियन तिबेट बॉर्डर पोलीस या पदी निवड झाली. या यशाबद्दल तिचा कॉलेजमध्ये सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. ए. पाटील होते. स्पर्धा परीक्षेसंदर्भात ए. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. पी. आर. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी पर्यवेक्षक एम. के. परीट यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. डी. मणेर यांनी केले. डी. एम. महाले यांनी आभार मानले.