इचलकरंजीत भरधाव टेम्पोची तीन वाहनांना जोराची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:26 IST2021-09-27T04:26:52+5:302021-09-27T04:26:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : अंड्याने भरलेल्या एका भरधाव टेम्पोने पंचवटी टॉकीजजवळ दोन मोटारसायकल व एका चारचाकी वाहनाला धडक ...

Ichalkaranji Bhardhaw Tempo hit three vehicles | इचलकरंजीत भरधाव टेम्पोची तीन वाहनांना जोराची धडक

इचलकरंजीत भरधाव टेम्पोची तीन वाहनांना जोराची धडक

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : अंड्याने भरलेल्या एका भरधाव टेम्पोने पंचवटी टॉकीजजवळ दोन मोटारसायकल व एका चारचाकी वाहनाला धडक दिली. रविवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये मोटारसायकलस्वारासह तीन जण जखमी झाले. या घटनेनंतर जमावाने टेम्पोची तोडफोड केल्याने तणाव निर्माण झाला. घटनास्थळी धाव घेत वाहतूक पोलिसांनी टेम्पो आणि चालकाला ताब्यात घेतले.

अशोक मुसळे, अविनाश गेजगे व रोहन गुळपांगे अशी जखमींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, जुबेर गडकरी यांच्या मालकीच्या आयशर टेम्पोतून (क्र. एमएच ०९ सीयू २६४६) चालक हारुण शेख हा अंडी घेऊन रविवारी दुपारच्या सुमारास छत्रपती शाहू महाराज पुतळ्याकडे जात होता. यावेळी जाताना टेम्पोने दोन मोटारसायकली व एका चारचाकी वाहनाला जोराची धडक दिली. यामध्ये तीन गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागरिकांनी तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शहरातील मुख्य मार्गावर ही घटना घडल्याने संतप्त झालेल्या नागरिक व नातेवाइकांनी टेम्पोची तोडफोड केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. याची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमावाला पांगवून टेम्पोसह चालक हारुण याला ताब्यात घेतले. या अपघाताची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Ichalkaranji Bhardhaw Tempo hit three vehicles