इचलकरंजीत चौघांकडून तिघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST2021-06-21T04:17:20+5:302021-06-21T04:17:20+5:30

इचलकरंजी : मोटारसायकलीचा रिक्षाला धक्का लागल्याचे समजून चौघांनी तिघांना लाकडी ओंडका व पातल्याने मारहाण केली. याप्रकरणी चौघांवर शहापूर पोलीस ...

Ichalkaranji beat three to four | इचलकरंजीत चौघांकडून तिघांना मारहाण

इचलकरंजीत चौघांकडून तिघांना मारहाण

इचलकरंजी : मोटारसायकलीचा रिक्षाला धक्का लागल्याचे समजून चौघांनी तिघांना लाकडी ओंडका व पातल्याने मारहाण केली. याप्रकरणी चौघांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.१९) दुपारी सांगली नाका परिसरात घडला. याबाबतची तक्रार शारदा राजू मांजरे (वय ३२) यांनी दिली आहे.

योगेश बाबासाहेब मांजरे, नरेश बाबासाहेब मांजरे, बाबासाहेब मांजरे व अश्विनी नरेश मांजरे (सर्व रा. आर.के.नगर, सांगली नाका) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, शारदा यांचा मुलगा निरंजन हा वडिलांना मोटारसायकलीवरून डबा देण्यासाठी चालला होता. यावेळी योगेश यांची घरासमोर लावलेल्या रिक्षाला त्यांच्या मोटारसायकलीचा धक्का लागल्याचे समजून त्याला शिवीगाळ केली. तसेच तुझ्या बाबाला कसे मारले, तसे तुलाही मारीन, अशी धमकी दिली. दरम्यान, शारदा व मुलगी राधिका यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून राधिका यांच्या तोंडावर पातले फेकल्याने त्या जखमी झाल्या. नरेश याने शारदा यांच्या डोक्यात ओंडक्याने मारहाण केल्याने त्याही जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Ichalkaranji beat three to four