इचलकरंजीत ५१ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:20+5:302021-05-31T04:18:20+5:30

इचलकरंजी : शहरात ३३ भागांतील ५१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान शेळके मळ्यामधील ५५ वर्षीय महिला, जवाहरनगरमधील ५२ ...

Ichalkaranji 51 positive; Death of three | इचलकरंजीत ५१ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

इचलकरंजीत ५१ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

इचलकरंजी : शहरात ३३ भागांतील ५१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान शेळके मळ्यामधील ५५ वर्षीय महिला, जवाहरनगरमधील ५२ वर्षीय महिला व शास्त्री सोसायटीजवळील ८३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सांगली नाका ६, जवाहरनगर ४, आसरानगर ३, पुजारी मळा, झेंडा चौक, मंगळवार पेठ, मथुरानगर, दत्तनगर, लिगाडे मळा, सोलगे मळा, वर्धमान चौक प्रत्येकी २, शहापूर, लालनगर, कुष्ठरोग वसाहत, चांदणी चौक, रामनगर, यशवंत कॉलनी, महालक्ष्मीनगर, नाईक मळा, केटकाळे गल्ली, आवाडेनगर, आंबेडकरनगर, छत्रपती संभाजी चौक, राजराजेश्वरीनगर, गणेशनगर, साखरपे हॉस्पिटलजवळ, पाटील मळा, पारीक कॉलनी, बंडगर माळ, लक्ष्मी-व्यंकटेशनगर, कोले मळा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत सहा हजार ६८६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पाच हजार ८९६ बरे झाले असून, ४४५ जणांवर उपचार सुरू आहेत. मृत्यूसंख्या ३४५ वर पोहोचली आहे.

Web Title: Ichalkaranji 51 positive; Death of three