शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

हुपरी, हातकणंगले नगरपालिका बारगळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2016 23:51 IST

हुपरी ग्रामस्थ आक्रमक : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदारसंघाची रचना आहे तशीच ठेवण्याची शिफारस

दत्ता बीडकर-- हातकणंगले तालुक्यातील नव्याने होणारी हुपरी नगरपरिषद आणि हातकणंगले या तालुक्याच्या ठिकाणी होणारी नगरपंचायत स्थापन होण्याची आशा बारगळली असून, हुपरी ग्रामस्थांनी यासाठी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी हुपरी आणि हातकणंगले मतदारसंघाची आहे तशीच मतदार संघ पुनर्रचनेची शिफारस तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून जिल्हा निवडणूक विभागाकडे पाठविल्यामुळे तालुक्यामध्ये नगरपरिषद व नगरपंचायत स्थापन करण्याची आशा बारगळली आहे.हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीची मतदारसंघ पुनर्रचना आराखडा तालुका निवडणूक विभागाकडून जिल्हा निवडणूक विभागाकडे पाठविला आहे. हातकणंगले तालुक्यामध्ये ११ जिल्हा परिषद आणि २२ पंचायत समितीचे मतदारसंघ आणि त्यामध्ये समाविष्ट केलेल्या गावांचा तपशील तालुका निवडणूक विभागाकडून तयार केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार २००२, २००७ आणि २०१२ च्या तीन निवडणुकीतील मतदारसंघाची पुनर्रचना विचारात घेऊन नव्याने होणाऱ्या निवडणुकीसाठी २०११च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेऊन मतदारसंघाची पुनर्रचना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तालुका निवडणूक विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाचे आदेश व सूचना याला बगल देत २०१२ मध्ये असलेले मतदारसंघ आहेत तसेच ठेवून त्यात कोणतेही बदल न सुचविता तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे अकरा व पंचायत समितीच्या बावीस मतदारसंघाची शिफारस केली आहे.तालुका निवडणूक विभागाकडून झालेल्या मतदारसंघ शिफारसीनुसार ९ सप्टेंबर रोजी मतदारसंघ प्रारूप आराखडा पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्ध होणार असल्याने हुपरी आणि हातकणंगले जिल्हा परिषद मतदार संघ जसेच्या तसे ठेवले आहेत. यामुळे हुपरी नगरपरिषद आणि हातकणंगले नगरपंचायत स्थापन होण्याची आशा बारगळली आहे. यामुळे हुपरी नगरपरिषद होण्यासाठी कृती समितीकडून नव्याने आंदोलन तीव्र करण्याच्या हालचाली झाल्या आहेत. हुपरी नगरपरिषदेसाठी ग्रामविकास विभाग आणि विधि व न्याय विभागाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. फक्त नगरविकास विभागाची मोहर बाकी आहे. नगर विकास खाते खुद्द मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे नगरपरिषदेची घोषणा होण्यासाठी राजकीय ताकद कमी पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. नगरपरिषदेच्या घोषणेसाठी : राजकीय ताकद कमी पडतेयजिल्हा परिषद मतदार संघाची अंतिम घोषणा होईपर्यंत हुपरी नगरपरिषद आणि हातकणंगले नगरपंचायत स्थापनेची घोषणा शासनाकडून झाली तरच तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघात मोठे फेरबदल होतील. मोठ्या प्रमाणात गावांची आदलाबदल होऊन तालुक्यामध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी घडून येतील आणि याचे तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होतील. हे शासनाचे जर-तरचे धोरण स्पष्ट करणार आहे. तालुक्यातील शिरोली आणि नागावचा कोल्हापूर शहर हद्दवाढीतील समावेश रद्द झाल्यामुळे शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघ आणि त्या मतदारसंघातील गावेही जैसे थे राहिल्याने या भागातील नागरिकांनी आपली हद्दवाढीमधून सुटका झाल्याचा आनंद साजरा केला आहे.